-
पु.
- रंग , रुप वगैरे जाणण्याचे इंद्रिय ; नेत्र ; दृष्टि ; नयन ; नेत्रेंद्रियाचे स्थान .
- दृष्टि ; नजर ; लक्ष ; कटाक्ष .
- लहान भोंक ; छिद्र ( कापड , भांडे इ० चे ).
- मोराच्या पिसार्यावरील डोळ्याच्या आकाराचे वर्तुळ ; नेत्रसदृशचिन्ह ; चंद्र ; चंद्रक.
- अंकुर , मोड फुटण्याची , येण्याची जागा ( बटाटा , ऊंस नारळ इ० स ).
- पायाच्या घोट्याचे हाड ; घोटा .
- गुडघ्याच्या वाटीजवळ दोन खळगे असतात ते प्रत्येक .
- माहिती सांगणारा ; ज्ञान देणारा ( माणूस , विद्या इ० ); बातमीचा , ज्ञानाचा उगम ( शास्त्र , कागदपत्र , हेर , गांवचा महार इ० ). धर्माधर्म ज्ञान समजण्याचा डोळा धर्मशास्त्र . पांढरीचे डोळे महार .
- माशाच्या पाठीवरील खवला ; सीताफळ , रामफळ , अननस इ० फळावरील खवला , नेत्राकार आकृति .
- ( खा . ) १६ शेराचे माप ; परिमाण , एकतृतीयांश पायली ( ४८ शेरांची ). १२ डोळे = एक माप व ६० मापे = एक साठ ).
- कुंभाराच्या चाकांतील एक खांच .
- (सोनारी ) जिन्नसाच्या इतर अंगापेक्षा तोंडाशी किंचित वाटोळा व डगळ असणारा भाग .
- दुर्बिणीचे आपल्याकडे असलेले भिंग .
- जात्याचे तोंड .
- मोटेस बांधावयाचे लाकण .
- ( विटीदांडू , कर ). आर डाव ; वकट , लेंड इ० मधील डोळ्यावरुन विटी मारण्याचा डाव . ( क्रि० मारणे . ) [ देप्रा . डोल ] ( वाप्र . )
-
ना. अक्ष , चक्षु , नयन , नेत्र , लोचन ;
-
डोळा उघडत नाही एखाद्या , गर्विष्ठ मगरुर माणसाबद्दल किंवा पाऊस एकसारखा पडत असल्यास म्हणतात .
-
डोळा ओळखणे दुसर्यास मनाचा कल समजणे , आशय , अभिप्राय ताडणे .
Site Search
Input language: