-
वि. १ मळ , अपवित्रता नसलेला ; शुध्द ; स्वच्छ ; पवित्र ; ( लक्षणेने व शब्दशः ) माती नसलेले ( वस्त्र ); ढग नसलेले ( आकाश ); कपट नसलेली ( बुद्धि ). इ० २ निर्भेळ ; मिश्रण , मिसळ नसलेला . [ सं . निर + मल ]
-
०वाचणे स्पष्ट , सुबोध , घडाघड वाचणे . श्रीमंत महाराज पेशवे बसूनि सकळ पाताड वाची निर्मळ । - ऐपो २६३ .
-
वि. मलहीन , विमल , साफ , स्वच्छ ( चारित्र्य , वस्त्र );
-
वि. निर्लेप , पवित्र , पावन , मंगल , शुची , सोज्वळ , शुद्ध ( मन , अंतःकरण ).
Site Search
Input language: