-
स्त्री. १ सामर्थ्य ; योग्यता ; लायकी . २ बळ ; ताकद ; प्रभाव . समासांत उपयोग . उदा० शरीरशक्ति ; इंद्रियशक्ति ; नेत्रशक्ति ; कर्णशक्ति ; वायुशक्ति ; ज्ञानशक्ति ; योगशक्ति ; कालशक्ति . नाम शक्तिबळें जळीं पाषाण तरले । . २ अर्थकक्षा ; मर्यादा ; सीमा ; व्याप्ति ( शब्द वगैरेची ). ३ स्त्रीदेवता ; पार्वती , लक्ष्मी , इ० देवी ; ईश्वराची स्त्रीरूप सामर्थ्यप्रतिमा . तुका हरिभक्ती करी । शक्ति पाणी वाहे घरीं । - तुगा ४११ . गणेश शारदा नाना शक्ती - दा ४ . ६ . १० . ४ माया ; परमेश्वरशक्ति . जे महंताची शांती । ... जे ईश्वराची शक्ति । . ५ प्रेरणा ; ( यंत्रास चलन देणारा कर्ता ). ६ एक आयुधविशेष ; अस्त्र . उदा० वासवशक्ति . चित्रनृपें प्रतिविंध्यप्राण हरायासि सोडिली शक्ति . । - मोकर्ण ९ . २४ . ७ कुंडलिनी . तैसी वेढियातें सोडिती । शक्ति . । - मोकर्ण ९ . २४ . ७ कुंडलिनी . तैसी वेढियातें सोडिती । कवितकें आंग मोडिती । कंदावरी शक्ति । उठली दिसे । - ज्ञा ६ . २२७ . ८ स्त्रीपुरुष मिळून जें मिथुन त्यांतील जी स्त्री ती . ९ शिवलिंगाला प्रतिरूप म्हणून असलेली योनी ; प्रकृति . तंत्रमताची देवता . हिची उपासना करणारे ते शाक्त . १० अमुक शब्द उच्चारिला असतां अमुक अर्थाचाच बोध व्हावा असा शब्दाच्या ठिकाणीं असलेला संकेत . ११ भाला . [ सं . शक् - सामर्थ्य असणें ]
-
०ग्रह पु. १ शब्दाचें विशेषार्थी ग्रहण ; अर्थज्ञान . २ शब्द , लक्षण , इ० वरून होणारा बोध , मत ; एखाद्याच्या संबंधानें झालेला ग्रह . त्याच्या वेषावरून हा साधु असा मला शक्तिग्रह झाला होता . ३ अस्तित्वांत असलेल्या वस्तूंचें अस्तिरूपी ज्ञान , ग्रहण , बोध ; वास्तविकज्ञान ; यथार्थज्ञान . [ सं . ]
-
०ग्राहक वि. शब्दाच्या अर्थाचा निर्णय करणारा ; निर्णायक . उदा० व्याकरण , कोश , रूढी , पध्दति . [ सं . ]
-
०चक्र न. मायारूप विश्व ; मायाचक्र . जें शक्तिचक्राशी वेगळ । . शक्तिचक्र जें अशेष । तें उपसंहरें निःशेष । मूळमायेसिसें । [ सं . ]
Site Search
Input language: