-
स्त्री. १ लिहिणें , वाचणें , गाणें , घोड्यावर बसणें , चित्रें काढणें इ० कौशल्याची कामें ; कला चौसष्ट आहेत . चौसष्ट कला पहा . २ चतुराईची यांत्रिक वगैरे योजना ; तिच्या रचनेचें ज्ञान . चालविण्याची युक्ति ; त्यांपासुन विवक्षित फल उप्तन्न करण्याचें चातुर्य ; त्याची गुप्त खुबी , किल्ली , मख्खी ; यटक . ३ चतुराई ; बुद्धिकौशल्य ; शोधक बुद्धि ; कसब ; युक्ति ; लीला . ' तुका म्हणे त्याची कोण जाणें कळा । वागवी पांगुळा पायवीण । ' - तुगा ३६७७ . ' तयांत फिरती तरी करिती अप्सरांच्या कला ' - नरहरी , गंगारत्नमाला १४३ . ( नवनीत पृ . ४३२ .) ४ चंद्राच्याबिंबाच्या सोळावा भाग ; प्रत्येक दिवशीं वाढणारी किंवा कमी होणारी चंद्राची कोर . ' चंद्राची लगती कळा । उपराग येतो । ' - र २ . ५ वेळाचें एक परिमाण सुमारें ८ सेकंदाबरोबर ; ३० काष्ठा म्हणजे एक कला . ६ एक अंशाचा ( वर्तुळाच्या ३६० व्या भागाचा ) एकसांठांशाचा भाग . ७ पदार्थमात्राचा ( सोळावा किंवा लहानसा ) अंश ; लेश ; लव ; तीळ ; रज ; कन . ८ कांति ; टवटवीतपणा ; स्वच्छपणा ; नितळपणा ; सौंदर्य ; तेज चमक ( माणसांच्या चेहेर्यावरील ). ' राजसुकुमार मदनाचा पुतळा । रविशशि कळा लोपलिया । ' - तुगा २ . ' घराची कळा अंगण सांगते .' ९ सूर्य ; पृथ्वी व परप्रकाश खस्त पदार्थ यांमध्यें कोण झाल्यामुळें पृथ्वीवरुन त्या पदार्थाची जी कांही प्रकाशित व अप्रकाशित आकृति दिसते ती . - सृष्टिशास्त्र १३८ . ग्रहांच्या प्रकाशित भागाचा जो अंश आपणाम्स वाढतांना किंव कमी होतांना दिसतो तो . - ब्रूस , ज्योतिःशास्त्राची मुलतत्त्वें . १० ( प्रणिशास्त्र ) शरीरांतील नाजुक त्वचेसारखा पडदा . ( इं .) इंटरनल मेंब्रेन . ११ ( अश्व ) कुच आणि कुष्किका घोड्याचें अवयव . - अश्वप ६४ . १२ ( ताल ) मात्रा ; नियमा नुसर तालाचे झालेले भाग ; हें आठ आहेत ध्रुवका ; सर्पिणी , कृष्णा , पद्मिणी ; विसर्जित ; विक्षिप्ता ; पताका व पतिता . १३ ( ताल ) खाली ; टाळी न वाजविणें . १४ शास्त्राचा व्यावहारिक उपयोग ; कोणत्याहि उद्दिष्ट विषयास उद्दिष्ट प्रसंगीं शास्त्रीय सिद्धांत लागू करणें ( शास्त्र यांच्या विरुद्ध .) - सुकौ १२ . ( सं .)
-
जीवंतमध्ये पहा .
-
स्त्री. १ कला या शब्दाच्यासर्व अर्थी योजतात . ' कीं हें नाना कळांचें जीवन । ' - दा १ . ७ . २ . ' असो सकळ कळा प्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण । ' - दा . २ किरण ; प्रकाश . ' जैसें शारदीयेचे चंद्रकळे । माजीं अमृत कण कोंवळें । - ज्ञा . १ . ५६ . ३ तेज . ' तैसें पिंडाचेनि आकारें । तें कळाचिकां अवतरे । ' - ज्ञा ६ . २५० . ' जनविजन समान कळा । तेचि आपाद वनमाळा । ' - एरुस्व १ . ४१ . ४ चंद्राचा १६ वा अंश ; त्यावरुन वोसावला । ' - ज्ञा १५ . ३०३ . ' चंद्रासि लागति कळा उपराग येतो । ' - र २ . ५ मनस्थिति . ' काय भाव एक निवडूं निराळी । जाणसी तूं कळा अंतरींची । ' - तुगा १६१३ . ६ देखावा ; दशा . ' दावूनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा । ' - तुगा २८३५ . ७ युक्ति . ' कळा तुजपाशीं आमुचें जिवन । उचित करुन देई आम्हां । ' - तुगा ९ . ८ चातुर्य ; करणी ' पाव्यामाजी रागज्ञान । केल्या अति मधुर गायन । तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची । ' - एभा १० . २६७ . ज्याची कळा तोच जाण । ' - ऐपो १४४ . ९ ज्ञान . ' कस्तूरीचा वास घेईन काऊळा । तरिच ती कळा कळे तया । ' - ब ९८ . १० हालचाल ; चलनवलन . ' शरीरांतूनिया प्राण गळाल्या लोपति सर्व कळा । ' - रत्न ४ . ३ . ११ प्रकार ' जेवीं माउली देखोनि डोळा । बालक नाचे नाना कळा । ' - एभा ३ . ५९९ . ( सं . कला )
-
पु. १ फुलाची मोटी कळी ; कोरक ; कळीचें मोठें स्वरुप , ' तो कनक चंपकाचा कळा । ' - ज्ञा ६ . २५७ . २ केळ . - एभा २ . ५७७ . ३ चौफुला वगैरेस शोभेसाठीं कळीच्या आकाराचें हातांत धरण्यासाठीं जें बोंड बसवितात . तें . ४ बुगडीचा वरचा कळीसारखा भाग . ( सं . कलिका )
Site Search
Input language: