Dictionaries | References ३ ३॥ { साडेतीन,औट } Script: Devanagari Meaning Related Words ३॥ Sanket Kosh | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 औट म्हणजे साडेतीन.साडेतीन पीठें १ तुळजापूरची भवानी, २ मातापुरची रेणुका, ३ जोगाईच्या आंब्याची योगेश्वरी आणि १-२ कोल्हापूरची लक्ष्मी हीं देवीचीं साडेतीन पीठें मानिलीं आहेत.साडेतीन मुहूर्त १ वर्षप्रतिपदा, २ अक्षय्यतृतीया, ३ विजया - दशमी हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा.साडेतीन वाद्यें १ वीणा, २ पखवाज, ३ बांसरी आणि १-२ मंजिरी मिळून साडेतीन वाद्यें.साडेतीन शहाणे (पेशवाईंतील) १ सखारामबापू बोकील, २ देवाजीपंत चोरघडे, ३ विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस अर्धा शहाण. हे साडेतीन शहाणे मराठयांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP