Dictionaries | References

विकटोपर्यंत अध्ययन

   
Script: Devanagari
See also:  विकटोपर्यंत ज्ञान

विकटोपर्यंत अध्ययन     

शुभकार्यप्रसंगीं प्रथम पुण्याहवाचन वगैरे विधींस आरंभ करावयाच्या वेळीं संकल्पास सुरूवात करतांना गणपतीस वंदन करण्याकरितां ‘ सुमुखश्वैकदंतश्च कपिलो गजकर्णक:। लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप: ॥ असा मंत्र म्हणतात. हा अगर्दी प्रारंभीचा मंत्र असूनहि एखाद्यास यांतील विकटो या शब्दापर्यंतच पाठ असतें, पुढील अक्षरेंहि येत नसतात
अगदींच थोडें कोतें ज्ञान. अकटोपासून विकटोपर्यंत पहा. ‘ धार्मिक व सामाजिक विषयासंबंधानें आमच्या लोकांचें ज्ञान विकटोपर्यंत जाऊन थडकलें होतें.’ -आगरकर.
अशा मनुष्यास त्याचें अत्यल्प अध्ययन दाखविण्याकरितां हा वाक्प्रचार योजतात. यावरून अज्ञानी, अध्ययन न केलेला, असा बोध होतो. ‘द्वारकाबाईचे पतिराज असे सुलक्षणी कीं, त्यांर्नी अकटोपासून विकटोपर्यंत अध्ययन करून दावा लावण्याचा घाट घतला.’- यशवंतराव खरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP