|
स्त्री. शेंदुर लावून बनविलेला पाषाणाचा देव ' अंगण वजा मोकळा जागेंत कच्च्या ओठ्यावर एक मैरव होता ' - के ३ . १० . १९४१ . पु. शंकराचा एक अवतार . विशेषतः असितांग , रुरु , चंड , क्रोध , उन्मत्त , कुपति ( किंवा कपाल ) भीषण आणि संहार हीं शंकराचीं आठ रुपें , मूर्ती . ( सामा . ) खंडेराव . भैरव भगवती मल्लारी मुंजा नृसिंह बनशंकरी । - दा ४ . ५ . ७ . एक राग . ह्यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जात संपूर्ण - संपूर्ण . वादी धैवत . संवादी ऋषभ , गायनसमय प्रातःकाल . ह्याच्या अवरोहांत कोमल निषादाचा अल्प प्रयोग विवादी ह्या नात्यानें केलेला दिसतो . ह्याचे अहीर , आनंद , गुणकली , प्रभात , बंगालशिव , रामकली , सौराष्ट्र , हिजेज इ० प्रकार आहेत . स्त्रियांचें एक कर्णभूषण . - वि . भयंकर ; भीतिप्रद ; भीषण . पापासि काळ आणि भैरव दुष्टभावा । - नरहरि , गंगाधररत्नमाला १५४ ( नवनीत पृ ४३३ ). [ सं . ] ०गुंडा पु. ( महानु . ) मोठा दगड . नक्षत्रांचा भैरवगुंडा । केवि पाडिजे गगनीचा हुंडा । - भाए ५९४ . ०चक्र न. भीषण परिस्थिति . ०जोगी पु. कानफाट्या गोसावी ; हे भैरवभक्तहि असतात . ०थाट पु. ( संगीत . ) एका थाटाचें नांव . ह्याचे पुढील सात स्वर असतात - शुद्ध षड्ज , कोमल ऋषभ , शुद्ध गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध पंचम , कोमल , धैवत , शुद्ध निषाद . फेरा , फेरी पुस्त्री . कानफाट्याची संध्याकाळची भिक्षेची फेरी . भैरवाष्टमी स्त्री . कृष्णपक्षांतील अष्टमी . [ भैरव + आष्टमी ] भैरवी स्त्री . एक राग . ह्यांत षड्ज , कोमल ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी धैवत . संवादी गांधार . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर . कोणी त्यास सार्वकालिक मानितात . ह्याच्या अवरोहांत तीव्र ऋषभ विवादी या नात्यानें दिलेला दृष्टीस पडतो . दुर्गादेवी . भैरवीचक्र - नपु . तंत्रशास्त्रापैकीं एक चक्र . यंत्र . भैरवीचक्रें बहुत केलीं । आणि सांप्रदायाहातीं ही करविलीं । - कथासा १४ . १११ . भैरवी थाट - पु . ( संगीत . ) एका थाटाचें नांव . ह्याचे पुढील सात स्वर असतात . शुद्ध षड्ज , कोमल ऋषभ , कोमल गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद . भैरवी यातना - स्त्री . काशीमध्यें जो मरण पावतो त्याच्या पदरीं जें पाप असतें . त्याच्या निरसनार्थ भैरवापासून जी यातना सोसावी लागते ती . भैरी - पु . भैरव नांवाचा देव
|