Dictionaries | References

बुभुक्षितः किं न करोति पापं ।

   
Script: Devanagari

बुभुक्षितः किं न करोति पापं ।     

लोभी भुकेला माणूस कोणतें पाप करण्याचें शिल्लक ठेवील ? असा माणुस वाटेल तें करील. सबंध श्लोकः - ( अ ) बुभुक्षितः किं न करोति पापं, क्षीणा नरा निष्करुणा भवन्ति । प्राख्याहि भद्रे प्रियदर्शनस्य न गंगदत्तः पुनरेतिक्कूपं ॥- पंचतंत्र ४.१६. [ एका विहिरींत गंगदत्त नांवाचा एक बेडूक राहात होता. त्याचें भाऊबंदांशीं वांकडें आल्यावर त्यानें प्रियदर्शन नांवाच्या एका सापाला भाऊबंदांचा नाश करण्यासाठीं विहिरींत आणलें. सापानें सर्व भाऊबंदांना खाल्ल्यावर तेथून जाण्याचें नाकारलें व गंगदत्ताच्या कुटुंबांतील बेडकांवर ताव मारुं लागला. शेवटीं एकटा गंगदत्त राहिला. त्याला फार पश्चाताप झाला पण करतो काय ? स्वतः तरी निसटावें म्हणून, दुसर्‍या विहिरींतील बेडकांना घेऊन येतों अशी थाप मारुन बाहेर पडला. सापानें बराच काळ त्याची वाट पाहून तेथील एका घोरपडीला गंगदत्तास घेऊन येण्यासाठीं पाठविलें. गंगदत्तानें वरील श्लोक सांगून परत येण्याचें साफ नाकारलें. ] ( आ ) त्यजेत् क्षुधातों महिलां स्वपुत्रं । खादेत् क्षुधार्ता भुजगी स्वमण्डं ॥ बुभुक्षितः किं न करोति पापं । क्षीणा नरा निष्करुणा भवन्ति ॥ -हितोपदेश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP