-
पु. १ इंद्रियें किंवा मन यांस गोचर वस्तु ; ज्ञानाच्या कोणत्याहि साधनानें माहीत होणारी गोष्ट . ( याअर्थी सामासांत ) विषयभोग , विषयत्याग , विषयासक्ति , विषयाभिरुचि , विषयसेवा - सेवन - प्रीति - तिरस्कार - संबंध - कथन - निंदा - ज्ञान - सुख - दुःख . २ एखाद्या क्रियेचा कर्ता अथवा कार्य ; एखादा विकार अथवा भावनेशीं संबध्द गोष्ट ; ( कर्ता , करण , शक्ति , अथवा कार्याचा ) प्रदेश , टप्पा , आटोका , स्थान वगैरे . उदा० कामाचा विषय स्त्री ; मोहाचा विषय पुत्र ; लोभाचा विषय वित्त ; रोगाचा विषय शरीर ; तसेंच क्रोध , हर्ष , दंड इत्यादींचा विषय . ( याअर्थी सामासांत ) विवाद - व्याख्या - गायन - लेखन - गमन - विचार - धर्म - ज्ञाति - हास्य - काम - संकल्प - विधि - निषेध - विषय . निजस्मृतिस जाहलीं विषय तीं तव श्रीपदें - केका ८ . ३ कार्य ; कर्तव्य ; कार्यक्षेत्र ; अधिकार ; व्यवसाय ; योग्य धंदा , काम . उदा० बोलणें हा वागिंद्रियाचा विषय ; मामलत करणें हा भिक्षुकाचा विषय नव्हे ; रफू करणें हा दाभणाचा विषय नव्हे . ४ उद्देश ; हेतु ; ध्येय ; मनांतील गोष्ट . तुम्ही जो हा उद्योग करीत आहां याचा विषय कोण ? ५ मुद्दा ; प्रकरण ; बाब ; संबंध . शब्द साधनरूप विषय ज्यांत असतो त्याला व्याकरण म्हणावें . ६ द्रव्य ; ऐवज ; माल . त्यास सार्या वर्षांत शंभर रुपयांचा विषय पोंचतो . ७ महत्व ; पर्वा ; दरकार . स्वामीचा आशीर्वाद असतां इतरांचा विषय मानीत नाहीं . - रा ३ . ३२४ . ८ कामेच्छा . जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंगसानें । - ज्ञा १६ . २५३ . रुचे विषय ज्या मिळे अमृत ते न मद्या पिती । - केका ४३ . [ सं . ]
-
०द्वार न. इंद्रिय . बहु हीं दुस्तर विषयद्वारें । - तुगा १८७४ .
-
०नियामक स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी , निश्चित करणारी , निवडणारी मंडळी .
-
समिति स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी , निश्चित करणारी , निवडणारी मंडळी .
Site Search
Input language: