Dictionaries | References

नारळ

   
Script: Devanagari

नारळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A cocoanut. 2 f Cocoanut-tree, Cocos nucifera. 3 m Cant. Pate, poll, sconce, noddle, costard, cranium. ना0 हातीं देणें To dismiss; to turn out and pack off.

नारळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cocoanut.
 f  Cocoanut tree, Cocos nucifera
नारळ हातीं देणें   To dismiss; to turn out and pack off.

नारळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बाहेरून टणक व आतून मऊ व पाणी असलेले एक फळ   Ex. कोकणात नारळ खूप असतात
HOLO COMPONENT OBJECT:
माड
HYPONYMY:
शहाळे
MERO COMPONENT OBJECT:
करवंटी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्रीफळ नारिकेल
Wordnet:
asmনাৰিকল
bdनारिखल
benনারকেল
gujનારિયેળ
hinनारियल
kanತೆಂಗಿನ ಕಾಯಿ
kokनाल्ल
malതേങ്ങ
mniꯌꯨꯕꯤ
nepनरिवल
oriନଡ଼ିଆ
panਨਾਰੀਅਲ
sanनारिकेलः
tamதேங்காய்
telకొబ్బరికాయలు
urdناریل , کھوپرا
See : माड

नारळ     

 पु. १ एक फळ ; नारिकेल . २ ( स्त्री . ) नारळीचे झाड ; माड . ३ ( ल . ) डोचके ; टकले ; बोडके . [ सं . नारिकेल ; सिं . नारेलु ]
०हाती   - १ घालवून देणे ; काढून टाकणे २ जाण्यासाठी निरोप देणे .
देणे   - १ घालवून देणे ; काढून टाकणे २ जाण्यासाठी निरोप देणे .
०पंचा   देणे - काम न करतां विन्मुख परत पाठवून देणे .
हाती   देणे - काम न करतां विन्मुख परत पाठवून देणे .
०कांकडे  न. नारळ व त्याच्यासारखे इतर पदार्थ . [ नारळ + काकडी ]
०गळ्या वि.  मोठे भोंक , भगदाड असलेले ; ज्यांतून नारळसुद्धां गळूं शकेल असे ( मोठे छिद्र ) ( अतिशयोक्तीने फाटक्या मोडक्या वस्तूस म्हणतात ).
०पाक   नारळी पाक - पु . साखरेच्या पाकांत खोबर्‍याचा कीस घालून बरफीसारख्या केलेल्या वड्या .
०माड  पु. १ नारळ येण्यासाठी राखलेले नारळीचे झाड . याच्या उलट भंडारमाड = ताडीकरितां राखून ठेवलेले . २ ( देशावर ) नारळीचे झाड . याच्या उलट इतर ताड इ० झाडे . नारळाचा चऊ चव पु . ( कों . ) नारळाचा कीस . काढला नारळाचा चऊ । - मसाप २ . १ . नारळाची आई स्त्री . १ नारळाची करवंटी ; नरोटी . २ ( ल . ) ( भिक्षेकरी नरोटी घेतात त्या वरुन ) भिक्षापात्र ; दारिद्र्यावस्था . ( क्रि० हाती येणे ). नारळी स्त्री . १ नारळाची अर्धी करवंटी ( भांड्यासारखी उपयोगी ); नरोटी . २ नारळाचे झाड . हे झाड चाळीस पन्नास हात उंच सरळ वाढते . सह्याद्रीच्या प्रदेशांत माड फार येतात . अव्वल प्रतीच्या झाडास प्रतिवर्षी ५०० पर्यंत नारळ येतात . झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे . सोटापासून खांब , तुळया इ० ; चुडता पासून शाकार , सर्पण ; खोबरे खाण्याच्या व तेल काढण्याच्या उपयोगी ; काथ्यापासून लोड , तक्के , दोर्‍या , गलबतावरील पाले ; चटया होतात ; पेंड गुरास घालतात ; करवंट्याचे तेल औषधी आहे . खोबर्‍याच्या किसापासून मुठेल तेल तयार होते ; ते पण व्रण ; जखमा इ० भरुन काढण्यास उपयोगी पडते . नारळी कांठ पदर वि . पदरामध्ये जरीची नारळाच्या झाडाची नक्षी काढलेले ( लुगडे , पागोटे इ . ) नवीन तर्‍हा नारळी डोईला । पदर पागोट्याची फिरकी । - होला १७ . नारळी पदरी पोषाख पु . जेथे सन्मानार्थे वस्त्र द्यावयाचे तेथे नारळ देणे . नारळी झांप स्त्री . प्रत्येक नारळीच्या झावळ्यावरील कर . नारळीपात्र न . नरोटी ; नारळी अर्थ १ पहा . नारळी पुनव पौर्णिमा स्त्री . श्रावणी पौर्णिमा . या दिवशी पावसाळा संपला असे मानून समुद्राची पूजा करुन त्यात नारळ टाकतात . नारळी भात पु . नारळाचा कीस घालून तयार केलेला भात . नारळेल न . १ नारळाचे काढलेले औषधी तेल . २ खोबरेल तेल . नारळ्या पु . ( कों . ) समुद्राच्या कडेला मासे खावून राहणारा , पिवळ्या पायाचा , चोंचीचा व पांढर्‍या रंगाचा पक्षी ; हा मारुन खातात . नारिकेल ली पुस्त्री . नारळाचे झाड . नारळ - ळी पहा . नारिकेल न . नारळ ( फळ ). नारिकेल पाक पु १ नारळांतले खोबरे किसून ते साखरेच्या पाकांत घालून केलेले एक मिष्ट खाद्य ; नारळीपाक पहा . २ ( ल . ) ( साहित्य ) नारळाची कवटी कठीण असते यावरुन ज्यांतला गूढ अर्थ उकलण्यास बराच परिश्रम लागतो अशा प्रकारचा लेख , प्रबंध , भाषण इ० याच्या द्राक्षापाक . ३ एक औषधी पाक . नारिकेल पाकन्याय नारळ बाहेरुन खडबडीत दिसतो . पण तो फोडण्याचे श्रम घेतल्यावर आंत गोड असे खोबरे सांपडते . त्याप्रमाणे वरुन ओबडधोबड दिसणार्‍या वस्तूच्या पोटांत शिरले म्हणजे माधुर्य आढळते . ते गत वृत्तांत अतज्ज्ञ जनांस बाह्यता केवळ नीरस वाटतात , त्यांच्या आंत नारिकेलपाकन्यायाने अत्यंत आल्हादकारक व उत्साहप्रद असारससंचय असतो . - नि . नारेळ ळी नारळ - ळी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP