|
वि. १ गार ; शीत . २ दाहशामक ( औषध , जेवणांत पदार्थ ). ३ ( ल . ) सुस्त ; धीमा ; मंद ; सावकाशीचा ; आळशी ; सौम्य ; समप्रकृतीचा . ४ शांत ; स्वस्थ ( देश , वस्तु स्थिति ). ५ शांत झालेले ; स्थिर ( डोळे , मन इ० ). ६ कमजोर ( ताप ); ढिले ( काम ). ७ भूतखेत इ० उपद्रवरहित ( घर , जागा ). ८ ( ल . ) नपुंसक ( मनुष्य ). [ सं . स्तब्ध ; प्रा . थड्ड ] ( वाप्र . ) ०करणे १ विसर्जन करणे . २ ताबूत वगैरे नदीत बुडविणे . ०पाणी - ( ल . ) एखादे कार्य बंद पाडणे . एखाद्याचा उत्साह भंग करणे . [ हिं . ] ओतणे - ( ल . ) एखादे कार्य बंद पाडणे . एखाद्याचा उत्साह भंग करणे . [ हिं . ] ०होणे पडणे पावणे मरणे . उत्तम लोकासि तुझा सेवक होऊनि थंड पावेल । - मोअनु ८ . ४१ . थंडक न . दाहशामक औषध किंवा उपाय . [ हिं . ] सामाशब्द - थंडगार वि . १ अति शीतल ( वारा , हवा , पाणी , वस्तु ); गार . २ स्थिर ; शांत . ३ संतोषी ; समाधानी ( हृदय , आत्मा ). ४ मेल्यामुळे थंड झालेला , गारठलेला . [ थंड + गार ] ०वेळ स्त्री. १ सकाळ , संध्याकाळचा समय . २ ( ल . ) स्थिर व शांत वेळ ( स्वतःच्या प्रकृतीची वगैरे ). थंडा वि . थंड ( अर्थ २ ते ८ ) पहा . [ हिं . ] थंडाई स्त्री . १ शीतलता . २ ( ल . ) तापहारकता ; दाहहारक गुण ( औषधांचा ). २ सालसपणा ; सौम्यता ; मंदी ; सुस्तता ; औदासिन्य ; दुर्लक्ष्य . ४ उपशम ; शांति ; उतार . ५ थंड औषध . ६ कुसुंबा . ७ बदाम , गुलाबकळी , खसखस , काकडीच्या व संवयीप्रमाणे भांग वगैरे एकत्र करुन वाटून दूध साखर घालून केलेले एक पेय . थंडाफराळ पु . केवळ थंड पाणी पिऊन , हवा खाऊन राहणे ( थंड उपहार ). थंडाय ( गो . ) ओलावा ; गारठा . थंडावचे ( गो . ) थंड करणे ; समाधान करणे . थंडावचे लिखित न . शांततेचा तह . थंडावणे अक्रि . १ थंड , शांत होणे ( मनुष्य , विकार , इच्छा , प्रकृति इ० ). २ दमट होणे ; सरदून ताठरपणा नाहीसा होणे ( कागद , कापड यांचा ). थंडावा पु . ( उन्हानंतरचा ) हवेचा थंडपणा ; सुख ; आराम ; स्वस्थता ; सुटका ( दुःख अथवा क्षोभ यानंतर ). उतार ; उपशम ; प्रशम . [ हिं . ] थंडेथंडे क्रिवि . १ सावकाश ; हलके हलके ; ढिलाईने . २ थंडावेळी ( रात्रीच्या , सकाळच्या वगैरे वेळी प्रवास करणे ). [ थंड ] थंडोसा पु . थंडावा पहा . [ थंड ] थंड्यापोटाने क्रिवि . शांतपणाने ; रागांत नसताना . थंडी स्त्री . १ थंडपणा ; गारठा ( हवेचा , पदार्थाचा ); सर्दी . खंडी बळ बहु कांपवि . पडसी जाणो सदुःसहा थंडी । - मोकर्ण ३३ . २ . २ थंडीची भावना . ( क्रि० भरणे ; वाजणे ). ३ तापहारकता ( औषधांची अथवा पदार्थाची ). ४ उपशम , उतार ( रोगाचा ); त्या पासून होणारे सुख , स्वस्थता . [ हिं . ] ०कातरा पु. थंडीने होणारा त्वग्विकार . थंडीचा ताठा पु . कडकडीत गारठा ( हवेचा ). थंडीचे पिळूं ( लूं )- न . थोडा वेळ पडलेली किंवा साधारण बेताची थंडी . थंडीवार्याचा क्रिवि . थंड व सर्द वारा वहात असतांना ; गारठा पडला असतांना . तुला ताप येतो आहे थंडीवार्याचा बाहेर हिंडू नको . [ थंडी + वारा ]
|