-
न. १ डोंगराचा किंवा पर्वताचा माथा , शिरोभाग ; झाडाचा शेंडा ; देवालय , घर इत्यादींचा शिरोभाग ; ( सामा . ) वरचें अग्र ; टोंक ; कळस . २ सुळका ; मनोरा . ३ ( मोठेपणा , सद्गुण किंवा दुर्गुण यांचा ) कळस ; पराकाष्ठा ; कमाली . त्यांतून कवींचे विचार तर्कशास्त्राच्या तराजूंत जोखून पाहणें हें तर अरसिकतेचें केवळ शिखर होय । . - नि . ४ ( व्यावहाराचा ) शेवट ; अखेरी . ५ ( संगीत ) एका तालाचें नांव . ह्यांत मात्रा सतरा व विभाग चार असतात . शिखरास जाणें - ( त्या त्या गोष्टीचा ) कळस , पराकाष्ठा होणें . शिखरास हात पोचणें - कृतकृत्य होणें ; मनोरथ पुरतेपणीं सफळ होणें ; महत्त्वाकांक्षा तृप्त होणें . शिखरापुरीस जाणें , शिकरापुरीस जाणें - ( विनोदानें ) ग ची , अतिशय गर्वाची बाधा होणें . शिखरीं काठया लागणें - ( जेजुरी किंवा मढी या गांवीं खंडोबाचे भक्तगण उंच काठयांना पताका लावून वाजत गाजत जाऊन खंडोबाच्या देवळाच्या शिखराला सदर काठया लावतात यावरून ल . ) हातीं घेतलेलें काम शेवटास नेणें ; ध्येय , उद्देश गांठणें ; कृतकृत्य होणें . शिखरीं पोट लागणें - ( आकंठ भोजन , पान , रोग किंवा गर्भारपण यांमुळें ) पोट वाढणें ; फुगणें . ( सामा . ) वाढणें ; मोठें होणें .
-
०मणि शिखरामणि - पु . शिरोमणी पहा . शिखरी - वि . कळसाचा ; शिखर असलेला ( पर्वत , डोंगर ). [ सं . ]
-
ना. कळस ( देवळाचा ), पर्वताचे उंच टोक , शेंडा ( झाडाचा );
-
To become very distended;--as the belly through gorging or disease, as the womb through pregnancy.
Site Search
Input language: