|
उ.क्रि. १ शिंगानें , डोक्यानें हिसडा , ढुश्शी मारणें , देणें . २ ( ल . ) घालवून देणें . ३ ( ल . ) दूर लोटणें ; बाजूस करणें ; खोडून काढणें ( दोष , आरोप ). - अक्रि . बागडणे ; हुंदडणें ; नाचणें ; धुडगुस घालणें ( मूल इ० ने ). [ ध्व . का . हुडीद ] हुंदडा , हुंदाडा - पु . १ हुंडका २ पहा . २ डोके , खांदा यांनी मारलेली ढुस्सी ; धडक . ३ जरीमरीसारखा एक रोग आणि त्याची देवता . ४ धसमुसळ्या , मुसळकंद . आडदांड माणूस ; मार्गात कितीहि अडचणी आल्या तरी धडाक्यानें पुढे जाणारा माणूस . ५ ( सोंगटया ) एकच फिरती शेवटची सोंगटी . हुंदडी , हुंदाडी - स्त्री . दूध पितांना वासरानें कासेस दिलेली ढुशी . हुंडका पहा .
|