-
न. १ शेत . २ तीर्थाची जागा ; पवित्र व धार्मिक स्थळ ; यात्रेचें , देवतेचें ठिकाण ; अयोध्या , गया , काशी इ० . ३ जागा ; स्थळ ; स्थान ; भूमिभाग . ४ ( भूमिति ) लांबी , रुंदी , उंची याप्रमाणें मापन करता येणारा पदार्थ , आकृति . ५ बारा शाळिग्रामांचा संच . ६ ज्यांत आत्मा राहतो असें प्राण्याचें शरीर ; सविकार व सजीव मनुष्यदेह . - गीर १४२ . ७ ( संतति उत्पत्तीचें स्थल म्हणून ) स्त्री ; पत्नी . जेंवि पितृक्षेत्रीं मीं , मत्क्षेत्रींहि तसें चि संतान । - मोआदि १९ . ३४ . ८ लंघन ; कडकडीत उपवास ( धार्मिक उपवास मात्र नव्हे ). ( क्रि० पडणें ; होणें ; घालणें ). ९ चोवीस शाळिग्राम , अकरा बाण , एकवीस नर्मदे गणपती , बारा सूर्यकांत व आठ सुवर्णमुखी देवी इतक्या देवतांचा समूह . १० उत्पतिस्थान . ११ यूध्दभूमि ; रणांगण . तो ना गवसेचि क्षेत्रीं । - कथा १ . ७ . ६९ . १२ रेखागणित ; भूमिति . १३ नकाशा ; आकृति . [ सं . ]
-
०गणित न. भूमितिशास्त्र .
-
०ज पु. स्वस्त्रीच्या ठायीं स्वतःचा भाऊ किंवा भाऊबंद यांचे पासून झालेला पुत्र ; परवीर्यापासून स्वस्त्री ( क्षेत्रा ) च्या ठायीं उत्पन्न झालेलें अपत्य . नियोगापासून झालेली संतती . प्राचीन काळीं हिंदुधर्मशास्त्रांत असल्या संततीस कायदेशीर मान्यता असे . द्वादशविधपुत्र पहा .
-
०जीवी वि. शेतकरी ; शेतीवर उपजीविका करणारा .
Site Search
Input language: