Dictionaries | References

शपथी

   
Script: Devanagari
See also:  शपथ , शपथे

शपथी     

 स्त्री. १ प्रतिज्ञेवर सांगणें - बोलणें ; आण ; भाक ; वचन ( क्रि० घेणें ; वहाणें ; खाणें ; करणें ; देणें ). सुगळ म्हणे रामा ! म्यां शोधावी जानकी , शपथ करितो । - मोवन ११ . ९९ . जर तर हे शब्द पूर्वी घालून जोराचा नकार किंवा दुजोरा देण्यांत येतो . उदा० करील तर शपथ . हालिवल्या अंगावर अगर काडीवर पडेल तर शपथ . २ दिव्य . [ सं . शप् ‍ शपथ घेणें ] म्ह० शपथ केली वहायला , भाकरी केली खायला . - मसाप ४ . ३ .
०वाहायाला   शपथेला मोकळा होणें - एखादें काम मुळींच केलें नाहीं असा दोष ठेवितां येऊं नये म्हणून कसें तरी ( हलगर्जीपणानें किंवा थोडें फार ) करणें ; शपथ घेण्यास सदसदविवेकबुध्दि आड येणार नाहीं अशा स्थितींत असणें .
०सोडणें   ( मुलींच्या खेळांत ) शपथेंतून मोकळें करणें . खालील वाक्य म्हणत शपथ सोडतात - शपथ सुटली ; कुंभाराची घागर फुटली ; हत्तीवरून साखर वाटली .
०पूर्वक   क्रिवि . शपथ घेऊन .
०पत्र  न. शपथपूर्वक लेखी जबानी ; प्रतिज्ञालेख ; शपथलेख ; क्रियापत्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP