-
पु. अव .
-
( अ ) जलाधिकार - प्रवाशांना व सरकारी नोकरांना पाणी पुरविण्याचा अधिकार . ( आ ) स्थलाधिकार - अनेक प्रकारच्या वस्तीच्या जागा ठरविणें व दाखवून देणें . हा पाटलाचा अधिकार . ( इ ) ग्रामाधिकार - लहान गांवांतील व्यापार व सामान्य धंदे यांची देखरेख करणें . ( ई ) कुललेखन - रयतेचा सरकारी हिशेब ठेवणें व सरकारी दप्तर सांभाळणें - हें कुळकर्ण्याचें काम . ( उ ) ब्रह्मासन - बेलिफाचा अधिकार . ( ऊ ) दंडविनियोग - मामलेदाराचा अधिकार . ( ऋ ) पौरोहित्य - ग्रामोपाध्यायाचें किंवा कुलोपाध्यायाचें काम . ( ऋ ) ज्योतिष - ग्रामज्योतिषाचें काम ; जोसकी . या अधिकारांचींच रुढ असलेलीं नांवें :- कोळीपणा , पाटिलकी , देशमुखी किंवा महाजनकी , कुळकरण , वर्तकी , धर्माधिकार , उपाध्धिक किंवा भटपणा , जोशीपणा .
-
(अ) १. जलाधिकार, २. स्थलाधिकार, ३. ग्रामाधिकार, ४. कुललेखन, ५. ब्रह्मासन, ६. दंडविनियोग, ७. पौरोहित्य, ८. ज्योतिष. (आ) १. कोळीपण, २. पाटिलकी, ३. देशमुखी किंवा महाजनकी, ४. कुळकरण, ५. वर्तकी, ६. धर्माधिकार, ७. उपद्धिकभटपणा, ८. जोसकी-जोशीपणा. (इ) १. स्नान, २. शौच, ३. भोजन, ४. निद्रा वगैरे. ‘एका खणाचे खोलीत सगळे अष्टाधिकार करू म्हणतां, पण ते होतील कसे?’
-
( ल . ) स्नान , शौच , भोजन , निद्रा , बसणें वगैरे शरीराच्या दैनिक विधींनाहि थट्टेनें हा शब्द योजितात . एका खणाचे खोलींत सगळे अष्टाधिकार करुं म्हणतां ते होतील कसे ?
Site Search
Input language: