-
पु. १ ज्वर ; शरीराचा दाहदर्शक विकार . २ ( सूर्याची , अग्नीची ) उष्णता ; तीमुळे झालेली पदार्थाची उष्णावस्था ; तप्तता ; ऊनपणा . त्यासी जळी होता निमग्न । जळाचा ताप शमे संपूर्ण । - एभा ३ . ४५५ . ३ ( ल . ) क्रोध , लोभ इ० मनोविकारांचा क्षोभ , तीव्रता ; उद्दीपित स्थिति . ४ संसारामुळे होणारी दगदग ; यातायात . ५ तळमळ ; मनाची अस्वस्थता ; संताप . ६ ( सामा . ) दुःख ; कष्ट ; त्रास . तैसे पुढीलाचेनि तापे । कळवळलिये कृपे । - ज्ञा १६ . १५७ . आला हगभाग्येच्या पोटाला म्हणुनि भोगितां ताप । - मोसभा ७ . ४३ . ७ ( सावकार , राजा , लुटारु ; उंदीर , ढेंकूण , इ० कांनी केलेला ) उपद्रव ; छळ ; जाच ; छळणूक . नवपंचकशी काया हरहर तरि तीहि ताप देत असे । - कमं २ . ७१ . ८ . - स्त्री . ( पावसाळ्यातील , पावसाळ्याच्या थोड्या नंतरचे ) सूर्याने प्रखर ऊन . ९ ( व . ना . ) शेक ; विस्तव ; शेकोटी . १० उन्हाळा . निरंतरामंद मरंद वाहे । तापांतही यास्तव रिक्त नोहे । - र ८ [ सं . तप = तापणे ; ताप ]
-
०येणे १ ज्वरविकार होणे . २ ( तंबाखूचा धंदा ) तंबाखूची पाने कापून त्यांच्या जुड्या बांधून , दडपून ठेवल्यावर ती तिसर्या - चवथ्या दिवशी गरम होणे . तंबाखूस पहिला ताप आला . सामाशब्द -
-
०करी वि. तापाने , ज्वराने आजारी असलेला .
-
०त्रय न. १ प्राणास भोगावी लागणारी आधिभौतिक , आधिदैविक व आध्यात्मिक या तीन प्रकारांची दुःखे , भोग ; त्रिविध ताप पहा . जिव्हारी आगी सूदली । तापत्रयाची । - ज्ञा ३ . २५४ . होता तापत्रयार्त त्वरित भववनी रक्षिता रानटाचा । - केका १२२ . २ दारिद्र्यदुःख , दशा ; गरिबीच्या यातना . [ ताप + सं . त्रि - त्रय = तीन ]
Site Search
Input language: