|
क्रि.वि. मोठ्यानें ओकणें , जखमेंतून रक्त घळघळा वाहणें , भळभळ पाणी ओतणें , निरर्थक निंदा , धमकावणी , बडबड करणें , वाटेल त्या बाजूनें लोकांनीं जलदीनें घुसणें , जलद पेटणें , मोठ्यानें धडकणें , अमर्याद खर्च करणें इ० क्रियांचें अनुकरण होऊन ). झटकन ; पटकन ; फटकन . भडभड भलतेंच बोले । तुकारामाचीं पदें . ( नवनीत पृ . ४४८ ). तोफ इ० कांच्या आवाजाचें अनुकरण होऊन . ( क्रि० वाजणें ; उडणें ). [ ध्व . ] भडभडा , ड्या - वि . मनास येईल तें , विचार न करतां बोलून टाकणारा . भडभडणें - अक्रि . भडाडणें ( विस्तव ). मोठ्यानें पेट घेणें ( गृह , जळण इ० ). पुष्कळ जोरानें व आवाज करुन वाहणें , फळफळणें ; उफाळणें . दुःखानें ऊर , अंत : करण भरुन येणें . भडभडून येणें - क्रि . शोकानें कंठ दाटून येणें . भडभडविणें , भडभडाविणें , भडभडवणें - सवि . जोरानें पेट घ्याववयास लावणें . भडभडाट - पु . आगीचा अतिशय भडका , डोंबाळा . दणका ; धडाका ; तडाखा ; कडाखा ; गर्जना ( तोफा , वादळ , शिविगाळ , निंदा यांचा ); सामान्यतः मोठा , गंभीर व एकवटलेला , गोंधळाचा आवाज , गोंधळ . दंगलीची , मजलसीची मौज ; आनंद करणें . भडभडीत - वि . फटफटीत ; चकचकीत , स्वच्छ . ( क्रि० उजाडणें ).
|