-
जातिफल (जायफळ) कुल, मिरिस्टिकेसी
-
जायफळाच्या झाडाचा अंतर्भाव असलेले लहान द्विदलिकित कुल, याचा समावेश मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) एंग्लर व प्रँटल आणि बेसी यांनी केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे किंवा वृक्ष, पाने साधी एकाआड एक, सतत हिरवी व तैलप्रपिंडयुक्त. एकलिंगी, नियमित, विभक्त झाडांवर, लहान फुले येतात,
-
परिदले जुळलेली, केसरदले ३-१
-
व जुळलेली, एका किंजदलाच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक बीजक, मांसल फळ तडकते, बियाला बीजोपांग असते. पुष्क रेषाभेदित. हचिन्सन यांनी हे कुल ऍनोनेलिझ (सीताफल गण) मध्ये घातले आहे. Knema attenuata (Wall) Warb
Site Search
Input language: