Dictionaries | References

तेथ

   
Script: Devanagari

तेथ     

क्रि.वि.  ( काव्य ) तेथे . [ सं . तत + स्था ] तेथचा - ला , तेथील - वि . त्या जागचा - जागेसंबंधी . [ तेथे ] तेथपर्यंत , तेथपावेत , तेथवर , तेथवेरी - क्रिवि . १ त्या जागेपर्यंत . २ त्या वेळेपर्यंत , कालापर्यंत . तेथपासून , तेथून , तोथोन - क्रिवि . १ त्या जागेपासून ; त्या वेळेपासून . ( अशिष्ट ) तेथने . तेथे - क्रिवि . त्या ठिकाणी , जागी . [ सं . तत्र ; प्रा . तथ्थ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP