|
वि. तळलेला ; तळून काढलेला . तळकट पहा . [ तळणें ] पु. १ निजण्याच्या उपयोगाची लहान चटई ; आंथरीचा तुकडा ; तळकट पहा . सांडला माझा फाटका तळका , कशी मज ढेकणे खाल्ली गे । - एकनाथपदे ? २ चपाती ; चांदकी ; लाटी , ३ चामडी भाजल्याने त्वचेला आलेला फोड , फुगोटी . ४ फुगलेल्या पोळीचा पापुद्रा . ५ जोड्याच्या तळाचा फाटून फाटून निघालेला तुकडा ; पापुद्रा ; ( सामा . ) कापून निराळा केलेला सपाट , चापट तुकडा ; काप . ( क्रि० उडणे ; निघणे ; जाणे ; काढणे ; घेणे ). ६ ( उभे पीक असलेल्या शेतांतील ) पीक नसलेला , मोकळा तुकडा ; ( सामा . ) ( पेरणी , नांगरणी , कापणी , निंदणी इ० वाचून राहिलेला ) शेत जमीनीचा तुकडा . ७ आंब्याचा अर्धा काप . ( क्रि० कापणे ; काढणे ; निघणे ). [ तळ ] पु. बांबूची लहान चटई ; हांथरी ; डाळी .
|