|
स्त्री. तोंडावरून अस्ताव्यस्तपणें लोंबणारी केसांची बट ; झिपरी . ( नेहमीं अनेकवचनी प्रयोग . उदा० झिंग्या , झिंज्या ). [ सं . झिंटी = झुडूप ] स्त्री. ( संगीत ) एक राग . ह्या रागांत षडज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण वादी गांधार , संवादी निषाद . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . हा सार्वकालिकहि मानतात .
|