Dictionaries | References

उठवणूक

   
Script: Devanagari
See also:  उठवण , उठवळ

उठवणूक     

 स्त्री. बसलें असतां स्वत : उठवत नाहीं , दुसर्‍यानें उठवावयास लागावें अशी अवस्था ( गुरें , घोडे इ० ची ) उठून उभें राहण्याची सुध्दां शक्ति नसणें . उठवणें ताठा करक - दा ३ . ६ . ४७ . आतां सर्वथा उठवण्या । - एभा ११ . १२०९ . ( क्रि० घेणें )
( ल . ) आपत्ति ; दारिद्र्य ; दैन्य ; दुर्बल दशा .
०मोडणें   
शक्ति परत येणें .
दारिद्र्य , निराशा यांपासून सुटका होणें ; उठवणीस येणें - ( कों . )
अतिशय अशक्त होणें ; मरावयास टेकणें ; उठवण घेणें ; दुसर्‍यांनीं उठवावें लागणें ; ( सामा . ) अतिशय दमणें ; थकणें . वैरणचारा महाग याजकरितां घोडीं व उंटें उठवणीस येऊन , अस्थिचर्मे जाहालीं . - भाब ५६ . [ उठविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP