-
पु. १ ओघ ; ओढा ; प्रवृत्ति ; झोंक . २ ( ल .) मनाचा किंवा इच्छेच ओढा ; बुद्धीची किंवा स्वभावाची प्रवृत्ति ; चित्तवृत्तीचा ओघ ; रोघ .' असत्कायी कल नसो मानसाचा । ' - भजननतरंगिणी ८३ . ३ र्हास , ओसरा , उतार यांचा आरंभ ( दिवस , विकार , लहर , पुर , अतिरेक , यांचा ). ( क्रि०खाणें , पडणें ) ' कांही कालापूर्वी सुधारणा ऐन शिकह्रास जाऊन पोंचल्याचें जें मान दिसत होतें त्यास आतां कल पडून लोकांच्या मनानें उलट खाल्याचीं चिन्हें ... दृष्टीस पडूं लागली आहेत ...' - नि ४९० . ' एकाच पारड्यांत सगळें वजन पडलें म्हणजे जशी तराजूची दांडी एकाच बाजूस कल खाते ...' - नि ४३९ . ४ पातळीचा तिरपेपणा , तिरकसपणा ( इं .) इक्लिनेशन ऑफ दि प्लेन . ' क्षितिज पातळींशीं उतरणीची सपाट जो कान करिते त्यास उतरणीचा कल म्हणतात .' - यंस्थि ९६ . ५ मळसूत्राचा तिरपेणा , चढ , वळण ; ( इं .) अँगल ऑफ दि स्क्रयू ; मळसुत्राचा कल . - यंस्थि १०१ . ६ वळण ; रोंख ; झोंक ( क्रि०धरणें = गाडीचें एक चाक देणें ; तोल सांभाळणें ).( सं . कल् = प्रवृत करणें )
-
पु. उतार . ' आम्हीं शरणपुरास आल्यानंतर दत्तूला बराच कल पडला .' - स्मृतिचित्रें . ( फलणें )
-
kala-kana-kara-diśī Imit. of the sharp sound of a sudden rent, crack, split. Ex. क0 फुटलें-उललें- चीर गेली.
-
क्रि.वि. एकदम फुतल्यानें , तुटल्यानें जो आवाज होतो तसा होऊन , करून ; त्या आवाजानें युक्त होत्साता . ' कलकन फुतलें उललें चीर गेली .' ' काय सुख वाणूं सुख्याचें जणूं कलकन छाती फाटेल ' - पअला ४ . १ . ( ध्व )
Site Search
Input language: