संदर्भ - इतर २

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


इतर

गे बाटली तिनानी सानी झाल्यो

दिवो लावी मी आडमिती

दिव्याच्या चंद्रज्योती

पिंगाना मेला सती. ।१६।

विरडे गावाच्या बायी,

पाणी आला तूट

बंधू माझा रागीट

बायी पाडील दारात``` ।१७।

विरडे गावाच्या बिदी

कैशाचो लोट गेलो

देव माझ्या माहेरीचो

आंघोळ दूध न्हालो ।१८।

विरडी गावाचा देव

सूर्यासमोर त्याचा गाव

देव निजला पलंगार

वारा कुटला मजेवार ।१९।

देऊळाच्या दारी

कोण नगार्‍या काटी मारी

देव माझ्या माहेरीचो

आपले सदरे सोना वाटे ।२०।

देवळाच्या दारी

तासो वाजेता पितळेचो

देव माझे माहेरीचो

राजा उठलो कचेगीचो ।२१।

बहिण नसात्या भावा

वस्ती घेई तू देवळात

शेळी भाकर पदरात

पाणी मिळेना नगरात ।२२।

समुद्रा पयले तडी

भाऊ ऋषीच्या पंगती

त्यांच्या नि आंघोळीशी

बायी पाडील्या सूर्यवंशी ।२३।

त्याच्या इच्छेसाठी

साळी सोलून केल्या बेशी

त्यांच्या भोजनाशी

रत्ना चिरुन केल्या बेशी ।२४।

धुरपरा नार म्हणे

'मी एकटी वाढू कशी ?'

किरीष्णा तिचा भाऊ

उभा राहिला सत्यासाठी ।२५।

धुरपदा वाढू गेली

गाठ सुटली चोळीयेची

लजा गेली त्या पांडवाची

किरीष्णा चक्रधारी

त्या रे पांडवासी तारी. ।२६।

भरल्या बाजारात

माझ्या ओळखीचा नाही कोण

तोंडाच्या गोडयेन

मीया जोडीले भाव भैन. ।२७।

देऊके गे दुवाळो

आमीया तुझे साली

देऊकी कधी न्हाली

दिस मोजूक विसरली ।२८।

वहित्या नि रे संड्या

कारोती विस्तारली

तुळसा बाई माझी

गोरी नागीण दिस्टावली. ।२९।

सोन्याची गे पाटली

मनगटी गे दाटली

नळाच्या गे पानीया

सर्व मुंबई ।३०।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:00:33.8800000