संदर्भ - भाऊ बहिण ४

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


भाऊ बहिण

साळीच्या तांदळाची,

वाण दोन्यावरी,

नेणता बधू माझो

कांता रूसली भान्यावरी. ।४६।

मास्तराच्या शाळे,

बंधू खेळता धूळ माती

मास्तरान मारली काटी,

बंधून मेळ्यली सरस्पती. ।४७।

तिनानी साणू झाल्या

रात्र आली ती आनंदाची.

लाडको बंधू माझो,

पटी वाचिता गोईदाची ।४८।

पटीये पुस्तका

काणीये झालो भार

लाडक्या बंधू माझ्या

वाच सीतेचा स्वंयवर ।४९।

चला नि बघू जावू,

आगीन गाडीची हवा मोठी

बंधू तो लिण्यासाठी

जेरबंदी पैसे लोटी. ।५०।

वाजंत्री गे वाजता,

देऊळाच्य़ा दारी

लाडक्या बधू माझ्या

देव येता रे कुळघरी. ।५१।

वाजंत्री वाजता,

देऊळाच्या कोना

लाडक्या बंधू माझ्या

देव येता रे तुझ्या खाना ।५२।

देवाच्या देऊळत

उभी होतय पागोळेक

सातेरी माय माझी,

बोलवी साऊलेक ।५३।

 

देवाच्या देऊळात

केदोळो मींया उभी

माहेरीच्या नि रे देवा

मला फजल दे रे बेगी ।५४।

देवाच्या देऊळात

बाई सातेरी किती गौरी

हातात चिंमू दोरी

सुर्यासमोर पाणी भरी ।५५।

देवाच्या देऊळात

फुलांचो झालो नाश

सातेरी माया न्हाली

तिच्या पाठीवर ओले केस ।५६।

न्हायनी पयलाडी,

कोण बाबडो चंदन तोडी

लाडको बंधू माझो

देऊळा खामे जोडी ।५७।

गाईच्या गोठणीवर,

वड पिकलो सारखेचो

भावानी बहिणीचो

खेळ तो पाखरांचो. ।५८।

देवाच्या देऊळात

शोभा बैसली घनदाट

लाडक्या बंधू माझ्या,

अठ गोईदा विडे वाट ।५९।


देवाच्या देऊळात

शोभा बैसली फकिरांची

लाडको बंधू माझो

हाती परात साखरेची ।६०।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:18:59.7800000