संदर्भ - देवी देवता ४

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


देवी देवता

देवाच्या देऊळात

नार कोणाला उठयीता

पोटी नाही पुत्र फ्ळ

द्र्व्य कोणाला साठयीता ? ।६१।

देवीच्या देऊळात

उभी होतय कईरात

सातेरी माया मज

बोलीता अयेरात ।६२।

धुरपदा वाठू गेली

गाठ सुठली चोळीयाची

एकवीस कौरवांची

लजा गेली त्य वैर्‍याची ।६३।

यशोदे गे बाई

किरीष्णा तुझो नष्ट

साठ तिनशे गवळणी

नदीर केल्या भ्रष्ट ।६४।

यशोदे गे बाई

किरीष्णा तुझो भाट

गवुळ्याच्या घरी

दह्या दुधाच्या फोडला माट ।६५।

यशोदे गे बाई

किरीष्णा बरमचारी

सोळा सहख्ननारी

किरीष्ण भोगून उभा दारी ।६६।

धावोनी धाव घेई

शका रायाच्या घरी जाई

शका रायाच्या घरी

इकाची म्हनी पानी

गिरीजेनारीसाठी

शंभू दे बैसले ।६७।

धावोनी धाव घेई

शका रायाच्या घरी

इकाचे जेवाणे

गिरीजेनारीसाठी शंभू देव जेवले ।६८।

धावोनी धाव घेई

शका रायाच्या घरी जाई

शका रायाच्या घरी

इकाचे पान विडे

गिरीजा नारीसाठी शंभू देवानी खायिले ।६९।

धावोनी धव घेई

शका रायाच्या घरी जाई

शका रायाच्या घरी

इकाची जमरवाना

गिरीजे नारीसाठी शंभूदेव निजले. ।७०।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:00:29.8030000