संदर्भ - इतर ७

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


इतर

पाऊसा वाचोनी

बाहुल्या कंबळणी

किरिष्णा वाचोनी

वेडया झाल्या त्या गवळणी ।९१।

अयाव मरण

दिघा तू रघुनाथा

कपाळीच्या कुंकणासाठी

नार चालली देवलोका ।९२।

तिनानी सानू झाल्या

दिवो लावी मी आडभिती

दियाच्या नि गे ज्योती

पिंगाना मेला सती. ।९३।

तिनानी सालू झाल्या

दियाची करा बेगी

लक्ष्मी दारी उभी

घरनी बाईचा मन बघी ।९४।

आजयाळाच्या नि गे देऊ

मज ये न कळती

माझे गे काकूळती

देव पापाणां गे बोलती ।९५।

विरडी गावू शार

केवढा गावू पेठ

आजयाळाच्या नि रे देवा

तुका कैशाची घालू भेट ? ।९६।

शेजयेन दिली भाजी

खाई मी गुमानित

तिसर्‍या महिन्यात

शेजयेन काढली झगडयात. ।९७।

जाव जाऊ जे भांडती

केळीच्या गब्यासाठी

आताचा राजे पापी

कोण केसान गळो कापी. ।९८।

पाणीयाच्या नि गे वाटे

मुंगळ्या गोनाळती

माझ्या नि पाठल्यान

रांडो शिदंल्या फनाळती ।९९।

पाणीयो जाते नारी

तुझो पालव पाठीवरी

मुरुरव पुरषाची

नजार छातीवरी. ।१००।

जीवाला जीव देई

देई त्या पुरुषाला

मुरुरव माणसाला

जीव देऊन व्यर्थ गेला. ।१०१।

येईलां वावदळ

फाटला केळीपान

मुरुरवाच्या शब्दान

देवा विटला माझा मन ।१०२।

भाऊ नि जे आपले

भावजय लोकाची

जानीया गोनावली

सरपोळी गोपाची. ।१०३।

मालवणी माझी नथ

पडली पानीयात

आताच्या राजीयात

सासु सुनेच्या काईद्यात ।१०४।

तोळाच्या नि गे घरी

तुपाना कारभारी

आपल्या द्र्व्यावरी

सासु सुनेचे हालकरी ।१०५।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:00:40.2970000