संदर्भ - इतर ४

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


इतर

चिरमुलां नि गे जुंना

कोणाच्या पाहुण्याचा

माझ्या त्या निवुन्याचा

येणा झाला ता तातडीचा ।४६।

भिड्या नि यल्लपाचा

जेवाण केला ता लाडावाचा

सोन्याच्या पलंगावर

जोडा बैसला साडवाचा. ।४७।

ती कोण येता

ताम्याच्या गे दुडीची ?

सुगंधी तान्ही माझी

गौळण मधुरेची ।४८।

उंच नि उंच माळी

कोण बाबडी गाणा गाई

रामाची सीताबाई

लवअंकुशा झोप काढी. ।४९।

थोराची गे सून

कामान भागली

उपर माळ्येवरी.

पदर टाकून निद्रा केली ।५०।

सुगंधी तान्ही माझी

गेयानी तिचा पती

शेला मारुनी जागयीली ।५१।

तळीयेचा नि गे पाणी

माणक्यांनी नासयीला

राण्याचा नि गे राजे

फिरग्यांनी नासयीला ।५२।

शिपायाची मूली,

चांभारासंगे गेली

चामडेची गादी केली

हिरव्या शेल्याची याद हली ।५३।

जिवनी माझो गेलो

कळला माझे आई

दारातली गे जाई

जाई फुलाया विसरली ।५४।

मांडीलो मीया रथ

माझ्या रथाला नाही बोल

देव माझ्या माहेरीचो

माझ्या दंडाला देई तोल ।५५।

शिनळीच्या नि गे घरा

किनळीचे वासे

मुरुरव थूंय बसे

माझ्या बंधूला लाज दिसे ।५६।

शेवंतीची पाती

मुरुरवा तुझे हाती

लोकांचे नारीसाठी

मुरुरव हिंडता मध्यरात्री. ।५७।

पानीया जाते नारी

तुझ्या घागर लायी चुना

मैतर झाला जुना

दाया डोळ्यांनी करी खुणा ।५८।

दोघीचा मैतरपण

आमी कशात चालवूया ?

पानीया गे जाताना

एकमेकीला बोलवुया ।५९।

दुपारच्या नि भारा

गायतरी बांधली जोता

सोडरे भाग्यवंता

तुझ्या गायतरी चरणा येता ।६०।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:00:36.6030000