मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
लौकिक किंवा रूढीचे विधि

लौकिक किंवा रूढीचे विधि

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


(१) स्मशानयात्रेच्यावेळीं मराठेलोकांत भजन करतात व वाजंत्र वाजवितात. तसेंच याप्रसंगीं गरीब लोकांस खैरात व कुतर्‍यांस खाण्याचे पदार्थ घालण्याची कित्येक लोकांत चाल आहे.
(२) गुजराथेंत बायका रस्त्यांत छाती बडवून रडतात. त्यास ‘ कुंठवुं ’ असें म्हणतात. कित्येक लोकांत भाडोत्री बायकाही रडूं घालतात. पुष्कळदां हें रडणें गाण्याच्या सुरांत चाललेलें ऐकूं येतें. ह्या गाण्यास ‘ राजिये ’ असें म्हणतात.
(३) अकराव्या दिवशीं दशदानें, अष्टदानें, उपदानें वगैरे करण्याविषयी सांगितलें आहे. त्यांत ज्याच्या त्याच्या ऐपती प्रमाणें पालखी, छडी, चवरी, अबदागीर, शालजोडी, पीतांबर, भगवद्गीता, शेगडी इत्यादि अनेक प्रकारच्या वस्तू मृतमनुष्यास परलोकीं मिळाव्या या हेतूनें दान करितात.
(४) सुतकांत दहा दिवसपर्यंत गरुडपुराण श्रवण करण्याची कित्येक लोकांत चाल आहे.
(५) तेराव्या दिवशीं नवीन वस्त्रे परिधान करण्याविषयीं शास्त्रांत सांगितलें आहे, त्यावेळीं आप्त इष्ट दुखवटा करतात. राजेरजवाड्यांत दुखवट्याचा दरबार होतो.
(६) सुतकांत मृताचे आप्तांचें समाधान करण्यासाठीं त्यांचे सोयरे - धायरे व इष्ट - मित्र स्वतः येतात अथवा दुखवट्याची पत्रें पाठवितात.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP