मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
श्मशानयात्रा

श्मशानयात्रा

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


प्रेतास “ त्यांची बुद्धि स्रुक् ( आहुती देण्याचें चमच्यासारखे स्रुक् नांवाचें पात्र ) होती; त्यांचें अंतःकरण आहुतीचें तूप होतें; त्यांची वाचा ही वेदी होती; त्यांचें ध्यान हे दर्भासन होतें; त्यांचें ज्ञान हें त्यांचा अग्नि होता; त्यांएं विज्ञान हें आग्नीध्र नांवाचा ऋत्विज होता; त्यांचा प्राण हें होमद्रव्य होतें; सामगान अध्वर्युस्थानीं होतें; बृहस्पति होतृस्थानीं होता; मन हा उपवक्ता होता; त्यांणीं ह्या मानसयज्ञाचा स्वीकार केला; हें जग निर्माण करून वश करणार्‍या बृहस्पते, तुझी आम्हीं कीर्ति गातों आणि तूं आमची कीर्ति कर, व कीर्तीनें युक्त होत्साता स्वर्गास जां. ” (ऐ. ब्रा. पं. ५-२५)
या दहा मंत्रांनीं स्नान घालितात व नव्या वस्त्रानें प्रेताचें आच्छादन करितात; आणि वस्त्राचा पायाकडील तुकडा फाडून क्रिया करणारा अधिकारी त्याचें उत्तरीय ( जानव्यासारखें गळ्यांत घालावयाचें वस्त्र ) करितो; व तें बारा दिवसपर्यंत प्रेतकृत्यांत धारण करितो. वस्त्रादिकांनी प्रेताचें आच्छादन केल्यावर प्रेत पालखींत ( अगर तिरडीवर ) पुढील बाजूस डोकें करून उताणें निजवितात आणि सजातीय लोक श्मशानांत नेतात. वाहकाशिवाय दुसरा कोणी तरी ( सामान्यतः क्रिया करणारा ) प्रेतापुढें अग्नि घेऊन चालतो. प्रेत व अग्नि यांचे मधून कोणी चालत नाहीं. प्रेतामागून बाकीचे सर्व लोक म्हातार्‍यांनां पुढें करून चालतात. रस्त्यांत ( सामान्यतः श्मशानाजवळ ) पालखी खालीं ठेवून सातूच्या पिठाचे दोन पिंड श्यामशबल नामक यमदूतांच्या नांवानें प्रेताच्या उजव्या व डाव्या बाजूस -
“ देवांच्या सरमा नांवाच्या कुत्रीच्या काबर्‍या रंगाच्या व चार डोळ्यांच्यादोघां मुलांस मागें टाकून चांगल्या मार्गानें तूं पुढें धांवत जा. आणि जे पितर यमासह सुखानें आनंद करीत आहेत, अशा त्या ज्ञानी पितरांकडे जा. ”
“ हे यमराजा, जे चार डोळ्यांचे कुत्रे तुझे रक्षक आहेत, व ज्यांची प्रशंसा लोक करितात, व जे मार्गांत रक्षण करितात, त्यांच्या स्वाधीन ह्याला ( प्रेताला ) रक्षणासाठीं कर; व ह्याचें कल्याण कर आणि आरोग्य दे. ” ( ऋग्वेद ७-६-१५) या मंत्रांनीं द्यावे.
नंतर प्रेतवाहक मागचे पुढें व पुढचे मागें असे बदलतात, व प्रेत श्मशानांत नेतात. ज्या ठिकाणी प्रेत जाळावयाचें, त्याचे वायव्य दिशेस अग्नि ठेवावा. व कर्त्यानें स्नान करून क्षौर करावें; आणि चितेची जागा साफ करून चितेकरितां बारा आंगळे खोल खाडा खोदावा

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP