मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
दश दानें

दश दानें

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


“ मृतास परलोकीं उपयोगीं पडाधीं म्हणून पहिले दिवशी संकल्प केल्याप्रमाणें दहा दानें करितों ” असा संकल्प करावा, व
१ गाय,
२ भूमि,
३ तीळ,
४ सोनें,
५ तूप,
६ वस्त्र,
७ धान्य,
८ गूळ,
९ रुपें,
१० मीठ.
याप्रमाणें दानें ब्राह्मणाची पूजा करून द्यावी.
१ गाई देतेवेळचा मंत्र :- “ जी यज्ञाला साधनीभूत व जगाच्या पापराशींचा नाश करणारी आहे, अशा या गाईनें विश्वरूप धारण करणारा देव तृप्त होवो. ”
२ भूमिदानाचा मंत्र :- “ वराह अवतारी श्रीविष्णूनें जे वर उचलून धरली, व जी सर्वांस आधारभूत असून विपुल धान्य व फळें देणारीं आहे, ती मृताला शान्ति देवो. ”
३ तिलदानाचा मंत्र :- “ महर्षि काश्यपाचे कुळांत तीळ उत्पन्न झाले आहेत. याकरितां यांच्या दानानें पितरांचे पाप नाहींसें होवो. ”
४ सोनें देतेवेळचा मंत्र :- “ हें सोनें ब्रह्मदेवाच्या उदरांत राहणारें आणि अग्नीचें बीजरूप, तसेंच अनंत पुण्य देणारें आहे, यासाठी मृतास शान्ति असो. ”
५ तूप देतेवेळचा मंत्र :- “ तूप कामधेनूपासून उत्पन्न झालें आहे, व सर्व यज्ञांत तें उपयोगीं पडतें. तें देवांचें भक्ष्य आहे, त्यायोगानें मृतास शान्ति प्राप्त होवो. ”
६ वस्त्रदानाचा मंत्र :- “ वस्त्रानें थंडी, वारा व ऊन्ह यांचें निवारण होतें, व लज्जेचें मोठें रक्षण होतें; तसेंच शरीरास तें भूषण आहे. यासाठीं त्यापासून शांति मिळो. ”
७ धान्यदानाचा मंत्र :- “ धान्य हें सर्वदेवरूप, आणि सर्वांचे उत्पत्तीस मोठें साधनीभूत असून, प्राणिमात्रांचें चरितार्थास उपयोगी आहे, हें मृतास शांति देवो. ”
८ गूळ देतेवेळचा मंत्र :- “ जसा ॐकार मंत्रांचा, तसा हा गूळ उसाचे रसाचें सार आहे. या दानाच्या योगानें मोठी संपत्ति घरांत नांदो. ”
९ रुपें देतेवेळचा मंत्र :- “ जें शंकराच्या डोळ्यापासून उत्पन्न झालें आहे, ज्याच्यापासून पितर, विष्णु व शंकर सदोदित प्रसन्न असतात, असें रुपें मृतास शान्ति देवो. ”
१० मीठ देतेवेळचा मंत्र :- “ जें शंकराला प्रियकर असून त्याच्या वांचून सर्व अन्नें व्यर्थ आहेत, असें हें मीठ मृतास शांत करो. ”

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP