मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
विविध धर्मांचे अंत्येष्टिविधीं

विविध धर्मांचे अंत्येष्टिविधीं

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


आर्यसमाज
१ प्रेतस्नान
२ स्मशानयात्रा
३ प्रेतदहन
४ सर्वांनी स्नान करून स्मशानांतून परत येणें
५ नंतर सवडीप्रमाणें विश्वान पुरुष व स्त्रीस उपदेशासाठीं घरी आणणें व सत्कार करणें
६ परोपकारार्थ सत्कार्यी धन दान करणें  

प्रार्थनासमाज
१ प्रेताजवळ उभें राहून ईश्वरप्रार्थना करणें
२ प्रेतास स्नान घालणें
३ स्मशानयात्रा
४ चितेवर प्रेत ठेवून प्रार्थना करणें
५ प्रेतदहन
६ पुत्रानें ( कर्त्यानें ) प्रार्थना करणें
७ कन्यांनीं चवथ्या व पुत्रांनीं बाराव्या दिवशीं करावयाचें आद्यश्राद्ध ( ब्रह्मोपासना व आमान्नदान अथवा ब्राह्मभोजन
८ वार्षिक श्राद्ध ( ७ प्रमाणें )

ब्रह्मसमाज
१ प्रेतास स्नान घालणें
२ प्रेतास सफेत कपडे घालणें
३ आप्त इष्टांनीं प्रेताजवळ बसून ईश्वरप्रार्थना करणें व शेवटचें दर्शन घेणें
४ पुत्रानें ( कर्त्यानें ) प्रेतास पुष्पमाला घालणें
५ सगळ्यांनीं उभें राहाणें व उपाध्यायानें ईश्वरप्रार्थना करणें
६ तिरडीवर प्रेत बांधणें
७ स्मशानयात्रा
८ प्रेतदहन
९ पुत्रानें ( कर्त्यानें ) प्रार्थना कर्णें
१० अस्थि व रक्षा यांचें संजय ( पहिल्या अथवा दुसर्‍या दिवशीं )
११ आठव्या दिवशीं श्राद्धयात्रा करणे व रक्षाकुंभ पुरणें; घरीं परत जाऊन पुत्रानें ( कर्त्यानें ) ईश्वरप्रार्थानारूपी श्राद्ध करणें, व उपाध्यायानें ईश्वर प्रार्थना करणें
१२ श्राद्धकर्त्यानें ईश्वराचा आशीर्वाद मागणें व परोपकारार्थ यथाशक्ति दानधर्म करणें

जैन
१ प्रेतस्नान
२ स्मशानयात्रा ( दिवसा )
३ प्रेतदहन
४ स्नान करून सर्वांनीं स्मशानांतून परत येणें
५ तिसर्‍या दिवशीं अस्थिसंचयन ( श्राद्धावांचून )
६ दहाव्या दिवशीं मंदिरांत जाऊन पूजा कर्णें व मंदिरास वस्त्रपात्रादि अर्पण करणें
७ दहाव्यापासून तेराव्या दिवसापर्यंत ज्ञातिभोजन व मृताच्या आत्म्यासाठीं स्तोत्रें म्हणणें
८ पांजरपोळ, मंदिर, धर्मशाळा वगैरे साठीं धर्मार्थ द्रव्यदान करणें
९ एक वर्ष पावेतों दर महिन्यास आमान्न देणें
१० एक वर्षानें ज्ञातिभोजन

पार्शी
१ प्रेतस्नान
२ प्रार्थना
३ स्मशानयात्रा ( दिवसा )
४ स्मशानांत ( दखम्यांत ) नेऊन प्रार्थनापूर्वक प्रेत उघडें ठेवून गिधाडांकडून खावविणें
५ गोमूत्रानें गृहशुद्धि करतात व प्रेताच्या जागेवर चंदनाची धुणी करतात; तसेंच प्रेतवाहकांस गोमूत्रानें व शुद्धोदकानें स्नान घालतात.
६ तीन दिवस पर्यंत मांसाहार वर्ज्य करतात
७ दहावे दिवशीं, महिन्यानें, सहा महिन्यांनीं, व वर्षानें अध्यारूंस जेवूं घालतात.

चिनी
१ प्रेतस्नान
२ देवाची ( धान्यपतीची ) प्रार्थना
३ पुरोहितास व आप्तस्वकीयांस मरणाची खबर देणें
४ प्रेत पोषाखासह पेटींत घालणें
५ स्मशानयात्रा
६ प्रेत पुरण्याची क्रिया
७ स्मशानांतून सर्वांनीं परत येणें
८ तिसर्‍या दिवशीं थडग्यापाशीं जाऊन मृतास खाण्याचे पदार्थ अर्पण करणें
९ सातव्या दिवशीं घरीं श्राद्धासारखी क्रिया करतात; याप्रमाणें सात आठवडेपर्यंत करतात
१० प्रेताचा आत्मा घरीं केव्हा येईल ती वेळ पुरोहित मुक्रर करतो. त्यादिवशीं एका खोलींत मृताच्या आत्म्यासाठीं भोजन तयार करून ठेवतात; त्याचें सेवन करून तो जातो अशी समजूत आहे.

जपानी
१ प्रेत स्मशानांत नेण्यापूर्वींची प्रार्थना
२ प्रेत पेटींत घालून घराबाहेर काढण्याची क्रिया
३ स्मशान यात्रा
४ प्रेत पुरण्याची क्रिया
५ प्रेत बाहेर नेतांच घर शुद्ध करतात व स्मशानांतून लोक परत येतांच त्यांना शुद्ध करण्याची क्रिया होते
६ पन्नास दिवस पर्यंत थडग्यापाशीं श्राद्धासारखी क्रिया करतात. त्यानंतर मृत मनुष्याचा आत्मा पितृलोकी जातो अशी समजूत आहे

मुसलमान
१ प्रेतास स्नान घालणें
२ फकिरांकडून प्रार्थना म्हणविणें
३ स्मशानयात्रा
४ पुरण्याची क्रिया
५ तिसर्‍या दिवशी सकाळीं आप्त इष्ट जमा होऊन कुराण वाचतात व थडग्यापाशीं जाऊन फुलें वाहतात
६ दहाव्या, विसाव्या, तिसाव्या व चाळिसाव्या दिवशीं खाना तयार करून आप्त इष्टांस व गरीबांस जेवूं घालतात

ख्रिस्ती
१ प्रेतस्नान व अंजन
२ प्रेतास सफेत पोशाख घालणें
३ प्रेत पेटींत घालणें
४ स्मशानयात्रा ( दिवसा )
५ प्रेताचें शेवटचें दर्शन घेण्यासाठीं तें खुलें ठेवणें
६ प्रेत थडग्यांत पूर्वेस पाय करून उताणें ठेवणें
७ मृताच्या आत्म्यास शांति मिळण्यासाठी सर्वांनीं प्रार्थना करणें
८ प्रेत पुरणें

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP