माधव जूलियन - स्वप्नयोग

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


स्वप्नयोग
[जाति शुद्धव]

झोपेंत कधी असतां मी
त्या शान्त तमोमय कालीं
प्रियदर्शन माझा येऊ,
ऊमटवी टवटवी गालीं
माझिया टिपें नेत्रींचीं
घे टिपुनि कृष्ण ओठांनी,
दे अरुण शान्ति ह्रदयाला
वचनामृत ओतुनि कानीं,
जणु अर्धोत्फुल्ल गुलाब
मृदु सरस ओठ ते गमती,
तो सुखस्पर्श होऊ तों
जीवींच्या तृष्णा शमती.
झोपेंतुनि हलक्या हातीं
ऊठवूनि धरी ह्रदयाशी
तों लागुनि जाय समाधी
त्या प्रेमळ करयुगपाशीं !
या जगीं न माझें कोणी
झोपेंत कोण मग थेऊ
अन नित्य वियोगीं माझ्या
तें स्वप्नयोगसुख देऊ ?
का घ्येय दूर गेलेलें
परत ये गाढ झोपेंत ?
मग राहिन अपुली आता
मी झोप सदाची घेत !
पण झोपहि गाढ न येऊ
जरि मरतें कामाखालीं,
ये प्रभो, झाक हे डोळे,
गाडून टाक पाताळीं !

ऑक्टोबर १९१३

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:28.4370000