मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
ऐकव तव मधु बोल

माधव जूलियन - ऐकव तव मधु बोल

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति चन्द्रकान्त]

ऐकव तव मधु बोल कोकिळे, ऐकव तव मधु बोल ध्रु०
नकोत मजला मैना, राघू, साळुङकी, चण्डोल
नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिन्दोल १
ऐक तुझा स्वर आर्त खरोखर वाटे मज विनमोल.
वसन्त नाही अजुनि सम्पला, कां झालीस अबोल ? २
सुखें वसन्तासङगे जा मग पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपूनहि पर्णामाजी खोलू. ३
पाहिन नन्तर वाट वर्षभर दाबुनि चित्त विलोल,
नको करूं पण आस ऐवढी जातां जातां फोल ! ४

ता. २४ ऑगस्ट १९२६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP