मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
पतंगाची आशा

माधव जूलियन - पतंगाची आशा

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[सुनीत, वृत्त हरिणी]

हृदय मम हें कोणीं नाही अजूनिहि जाणिलें,
भटकत कुणाच्या छ्न्दें मी असा भ्रमतों पिसा -
सकल बघती आहे माझा किती भरला खिसा,
कुणिहि न बघे हृद्रत्नाचें ऊपायन आणिलें.
चतुर दतिते, तूतेंही हें नये कधि पाहतां -
कृश मम तनू, ओले डोळे, विशीर्ण दशाअ पहा;
सहन करितों कोणासाठी अलौकिक ताप हा ?
वळ, बघ जरा मी प्रेमाने तुझा छळ साहतां.
मधुर रुचिरे, अन्धारीं या प्रकाश तुझा हवा,
मग बघ पतङगाची क्रीड - नको पण आस ती !
विफलच मनोराज्यें सारीं ऊथे नित भासती,
मज न रुचते शिष्टाचारी स्मितांतिल वाहवा.
सरस रमणीयार्थाचें गे सुवर्ण अकिञ्चन
कवि पिकवितो होतां रामाद्दगमृतसिञ्चन.

ता. २१ जानेवारी १९१२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP