मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| प्रल्हादचरित्र श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती प्रल्हादचरित्र अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा प्रल्हादचरित्र Translation - भाषांतर प्रल्हाद, दैत्यबालकांस उपदेश करितो :---घ्या हरिच्या नामा, लिहितां कशास ओनामा ॥ गडयानो घ्या० ॥धृ०॥सांगतों ऐका एक वर्म ॥ दुर्लभ हें मानुषजन्म ॥ यास्तव आचरुनि सत्कर्म ॥ पहावा भागवती धर्म ॥ दु:खसें प्राप्त होय शर्म ॥ यत्न त्या कशासरे परम ॥ न पावे हरिवांचुनि क्षेमा ॥ लिहि० ॥१॥शरण सद्नुरुला जावें ॥ हरिभजनीं नच लाजावें ॥ हरिचें सगुण रूप पहावें ॥ निर्मल भावें पूजावें ॥ हृदयीं पदपद्म घ्यावें ॥ सर्व हरि असेंच समजावें ॥ साडनि हृदयांतुनि कामा ॥ लिहि० ॥२॥आपुल्या हृदयीं जो वसता ॥ नलगे प्रयास त्या भजतां ॥ धनसुतजायेची ममता॥ हरिचें चरणांबुज नमितां ॥ विठ्ठल नेइल निज धामा ॥ लिहि० ॥३॥श्रीमद्भागवताच्या स्कंध ७ यांत प्रभु, स्वभक्तरक्षणार्थ नृसिंहरूपानें स्तंभांत प्रकट झाले, त्या वेळचीं हीं पदें.पद - २ रें. दत्त दिंगबर मूर्तिया चालीवर.स्तंभीं नरहरि अवतरला ॥ स्तंभीं नरहरि अवतरला ॥धृ०॥सत्य कराया निज जन भाषित चराचरांतरिं संचरला ॥ केवळ न मनुज न केवळ मृग ॥विग्रह अत्यद्भुत धरिला ॥ स्तं० ॥१॥कडकडकड स्तंभ उकळला ॥ गडगडगड रव नभिं भरला ॥ थरथरथरथर केश थरारती ॥ करकर करि रद गुरगुरला ॥ स्तं० ॥२॥क्रुद्धतमें चिरयुद्ध करुनिया ॥ उद्धत अरि निज करिं धरिला ॥ करुनि अंकगत खरतर नखरें ॥ उदरीं चरचरचर चिरिला ॥ स्तं० ॥३॥गगनिं अमरजनिं सुमनिं वर्षिला ॥ जो वनिं मुनिजनिं मनिं धरिला ॥ नारदादिसुरगायकनिकरें परतर परपरम स्तविला ॥ स्तं० ॥४॥हिरण्यकश्यपूच्या, प्रभुद्वेष, साधुनिंदा, गोब्राम्हाणपीडाइत्यादि दुष्कर्मानें त्यास दुर्गति प्राप्त होईल, ती न व्हावी म्हणून साधु प्रल्हाद देवाची प्रार्थना करितो.पद - ३ रें. राग जोगी (माझा कृष्ण) या चालीवर.देवा दर्गति मात्र न हो मत्पितया ॥धृ०॥पिडिले गाई विप्रविशेष ॥ धर्म बडवीले नि:शेष ॥सत्कर्माचा मोठा त्वेष ॥ त्यांतुनि द्वेष या चरणीं ॥ देव० ॥१॥संत्रासले दिव्यमुनी ॥ देववृंदाला जाचणी ॥ केवळपातकि चूडामणी ॥ किति अवगुणीं वर्णावा ॥ देव० ॥२॥याच्या दुश्चरितज्वलनांत ॥ होरपळले प्राणीजात ॥देवा ऐसा हा मम तात ॥ यास्तव हात जोडितसें ॥ देव० ॥३॥याच स्मरतां दोष अनंत ॥ कैसा काय होइल पंथ ॥चित्तीं वाटतसे बहु खंत ॥ विठ्ठलपंतमतिदात्या ॥ देवा० ॥४॥प्रल्हादाची प्रार्थना ऐकून देव उत्तर करितात :---पद - ४ थें. राग जोगी, चाल सदर.वत्सा दुर्गति काय तुझ्या ॥ या पितया ॥धृ०॥ऐकुनि प्रल्हादाची वाणी ॥ जैसी पीयूषाची खाणी ॥नरहरिलोचनाला पाणी ॥ ये तत्क्षणीं गहिंवरला ॥ वत्सा० ॥१॥तुजसारिखा सन्मणि ॥ आला ज्याचे उदरांतुनी ॥ त्याच्या दुर्गतिला चिंतुनी ॥ व्यर्थ मनिं कां झुरसी ॥ वत्सा० ॥२॥ज्याचे वंशीं माझा दास ॥ त्याला वैकुंठीं बा वास ॥ व्यर्थ होऊं नको उदास ॥ धरिं विश्वास मद्वचनीं ॥ वत्सा० ॥३॥ठेउनि पद्महस्त तो शिरीं ॥ प्रेमें घेउनि अंकावरी ॥ विठ्ठलपंत - प्रभु - नरहरी ॥ कृतार्थ करी निजदासा ॥ वत्सा० ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 11, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP