मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
उपदेश पद

उपदेश पद

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - (उद्धवा सांत्वन या चालीवर) एकताल.

रामराम बोला वाणी, मन लावा राघव चरणीं ॥धृ०॥
कर्मतत्वयहन कळेना, कळले तरि सांग घडेना ॥ कर्तृताभिमान उडेना, कामाचा दोष झडेना ॥
ब्रम्हार्पणबुद्धि जडेना, पुण्याशीं गांठि पडेना ॥ अंधारि निशा उझडेना, हितकोठुनियां आडरानीं ॥ रामराम० ॥१॥
साधूचा संग धरावा ॥ नाहीं ज्या आपपरावा ॥ स्वकरें तच्चरण चुरावा, हरि महिमा श्रवणकरावा पेमभावहृदयिं धरावा, कीर्तनीं करा सुगरावा ॥ भवसिंधुसुखें उतरावा, जन्माची होय शिराणी ॥ राम० ॥२॥
विषय हे विषापरि विटती, स्वयमेव क्लेशहि सुटती ॥ वासना मूळही आटती, चित्ताच्या वृत्ती तुटती ॥
स्वानंद सुखाची खाणी ॥ राम० ॥३॥
शास्त्रदीप घेउनि निघतां, निगमागम शोधुनि पाहातां ॥ संतांसी हितगुज पुसतां, सुगम हाचि दावीपंथा ॥
आहेत मतांतर कंथा, ज्या रुचल्या नाहि अनंता ॥ म्हणून हाचि विठ्ठलपंता, पथ गमला निर्मल वाणी ॥ रामराम०  ॥४॥

पद - कानडयाचा बहार तिताल.

(कैसा निकसी चांदणी या चालीवर.)

कां फिरसी तूं रिकामा ॥ शरण रिघे श्रीरामा रामा ॥ कां० ॥धृ०॥
दैवाधीन तो अन्नाच्छादन ॥ त्याचा काय हमामा ॥ कां० ॥१॥
पुत्र कलत्रहि मित्र कुणाचे ॥ कोण कुणाचा मामा ॥ कां० ॥२॥
दीनपणें मदमत्त जनाचा ॥ कां करितोसि खुषामा ॥ कां० ॥३॥
भक्तजनांसी नुपेक्षी प्रभु हा ॥ वाजे वेद दमामा ॥ कां० ॥४॥
विठ्ठलपंत प्रभु करुणा कर ॥ नेईल निजसुख धामा ॥ कां० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP