मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
पदे ९ आणि १०

पदे ९ आणि १०

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद, (चाल - धन्य हे प्रदक्षिणा)

क्षितिप पुरंदर कौस्तुभकंधर सद्‌गुणगणमंदिर रामा ॥
अमरधुरंधर परिधृत मंदर सुंदर जलधरश्याम ॥
जगदाभरण भवांबुधितरण श्रितसुखवितरण राम ॥
कल्मषहरण सरसिजचरण प्रणतरक्षण गुणधाम ॥
हीरकरदन सुधाकर वदन द्विषन्निषूदन राम ॥
करुणासदन विनिर्जितमदन क्रूरकदन भृतकाम ॥
मणिसाररसन हिरण्मयवसन व्यसननिबर्हण राम ॥
मंदहसन खलविशसन विठ्ठलपंत कौतुकाराम ॥१॥
पद, (चाल - धन्यहे प्रदक्षिणा.)
करकमलोदर कृतकार्मुकशर बांधुनि द्दढतर माज ॥
अगणित वैभव किमपि न गणितां साधित नत जनकाज ॥धृ०॥
नारद शुकसनकादिक सज्जन जननिर्भर निर्व्याज ॥
यद्‌गुणगणपीयूष श्रवणें प्राशिति करुनि समाज ॥१॥
मलमूत्रकरंड तनुला करशिल कितिही नवनव साज ॥
ओढितील जंव यमकिंकर तंव नचले अन्य इलाज ॥२॥
भव - सरसिजभव - मुख दैवतनुत भवजलनिधिंत जहाज ॥
यत्पदंपजकंपतविठ्ठलें वरिलें त्यजुनि मिजाज ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP