मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
सुकुमार मुखकमल । निजसार न...

पांडुरंगाची आरती - सुकुमार मुखकमल । निजसार न...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

सुकुमार मुखकमल । निजसार निर्मळ ॥
सांवली सुनील तनू ॥  भ्रमरांग कुरळ ।
झळकती दिव्यतेजें ॥  दंत माजी पातळ ॥
मिरवलों मयूरपत्रें ॥  मुकुट कुंडले माळ ॥ १ ॥
जय देवा जगदीश्वरा ॥  धन्य रखुमाईवरा ॥
आरती करीन काया ॥ ओंवाळीन सुंदरा ॥ धृ. ॥
गोजिरे ठाणमाण ॥ भुजा मंडीत चारी ।।
शोभती शंख चक्र ॥ गदा पद्ममोहरी ह्रदयीं ब्रह्मपद ॥
बाणलेसे शृंगारी ॥ गर्जती चरणी वाकी ॥
कंठ कोकिळस्वरी ॥ २ ॥
घवघवीत उटी अंगी ॥ पावन चंदनाची ॥
ललाटी कस्तूरीची ॥ कास पीतांबराची ॥
कटीसूत्र वरि साजिरे ॥ प्रभा वर मोतियांची ॥
संगीत सकळ मुद्रा ॥ पाऊलें कुंकुमाची ॥ ३ ॥
सौभाग्य सुखसागर ॥ गुण लावण्यखाणी लाघवी दीनवत्सल ॥
विश्व लाविलें ध्यानी ॥ आश्चर्य देव करिती ॥
ऋषि राहिले ध्यानी ॥ धन्य तें प्रसवली ॥
ऎसिया नंदपत्नी ॥ ४ ॥
वर्णिता ध्यानमहिमा ॥ श्रुति राहिल्या नेती ॥
रविकोटी चंद्र तारा ॥ प्रकाशा न तुळती ॥
उदार सुर रंग ॥ गंभीर आनंदमूर्ती ॥
तुकयाबंधु म्हणे ॥ स्तवूं मी काय कीर्ती ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP