मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|भागवत रामायण| भागवत रामायण - अध्याय ३ भागवत रामायण भागवत रामायण - अध्याय १ भागवत रामायण - अध्याय २ भागवत रामायण - अध्याय ३ वामन पंडित - भागवत रामायण - अध्याय ३ कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : bhagavat ramayanvaman panditभागवत रामायणवामन पंडित अध्याय ३ Translation - भाषांतर तदुपरि शुक सांगे राम मांडी मरवा तें निज पदचि यजी जें हें जगद्धाम खातें गुरुवचन विधानें लंकना थारि पूजी सुर - मय सुर सेवी तद्रिपूचा रिपू जी ॥१॥ दिशा पूर्व होत्या दिल्ही दक्षिणा हो दिल्ही ब्रह्मयातें दिशा दक्षिणा होप्रतीची स्व अध्वर्यु दे जो तयाला उदीची दिशा दे स्व - उद्गात याला ॥२॥ आचार्य जो मध्यम भू तयाला देतां महा उत्सव दात याला हें निस्पृह ब्राह्मण सर्व लाहो गोडी ह्नणे राम मतीस लाहो ॥३॥ तनुस अंबर मात्रचि भूषणें इतर सर्व दिल्हें रघु - भूषणें करि असें रघु - नंदन दान कीं उभि समंगळसूत्रचि जानकी ॥४॥ घेऊनियां ब्राह्मण सर्व लाहो ते बोलती ब्राह्मण वत्सला हो जो ब्राह्मणाचा स्वयमेव देव प्रभूसित्या बोलति भूमि - देव ॥५॥ न जी दीधलें काय आम्हांसि देवा दिल्हें फार याहूनिही देव - देवा प्रकाशोनि चित्तीं अविद्या तमातें हरी देखतों त्याचि सर्वोत्तमातें ॥६॥ सर्वज्ञता दशशताऽननही न मोजी ब्रह्मण्य देव रघुराज तुतें नमो जी तूं पुण्य मूर्ति अजि मस्तक - रत्नदेवा जो दे स्व पाद - रज हंस जना सदैवा ॥७॥ जयाचा जगीं कीर्ति - सल्लाप होतो स्वयें गूढ - राती जना हो पहा तो वदे एक कोण्ही स्व - भार्येस वाचा तितें आयके श्रोत तो राघवाचा ॥८॥ स्वयें जासि दुष्टे पराच्या गृहातें नव्हे राम मी कीं धरुं तूज हातें दशग्रीव लाऊनि ने हात सीते वधू - लुब्ध अंगीकरी हा तसीते ॥९॥ दुराऽराध्य जे अज्ञ ते लोक रीते न जाणोनी वार्त्ता अशा ही करीती ह्नणूनी सतीतें वियोगाऽश्रमातें करी जाय ते वाल्मिकी - आश्रमातें ॥१०॥ ऋषि - जवळि असे ते गर्भिणी राम - राणी वन विभवहि मानी डोहळ्याची शिराणी कुश लव सुत दोघे होति ते दिव्य काळीं मुनि करि विधि - कर्मे उत्सवाच्या सुकाळीं ॥११॥ ऐसेच लक्ष्मण - कुमारहि वंशे - केतु तो एक अंगद दुजा सुत - चित्रकेतु तक्षाऽख्य पुष्कळ असीं भरताऽत्मजांचीं नामें कुळें बहुत विस्तरणार ज्यांचीं ॥१२॥ शत्रुघ्न - पुत्री रच - समान साचीं नामें सुबाहु श्रुत सेन साचीं शत्रुघ्न मारी असुरास आणी तद्वित्त रामार्पण - हेतु आणी ॥१३॥ शत्रुघ्न नाम - गत दाखवि अर्थ साचा कीं पुत्र जो लवण त्या मधु राक्षसाचामारुनि तो मधुवनीं मधुरा स्त्रजी कीं जी माजि कृष्ण - तनु राम खळास जिंकी ॥१४॥ पतीचीं पदें काननीं राम - रामा स्मरोनी ह्नणे आननीं राम रामा मुनीच्या करीं पुत्र आणूनि घाली क्षितीत स्वयें माय - पोटीं निघाली ॥१५॥ आयकोनि जहि शोक निवारी चालिलेंच नयनांतुनि वारी राखिले गुण तिचे त्दृदयातें नाऽवरेच आजि त्या सदयातें ॥१६॥ सीता हेतु क्लेश आद्यंत रामा एवं लोकीं दुःख मूळाच रामा थोरां थोरां कष्ट यांच्याचि संगें दावी ऐसें राम सीता - प्रसंगें ॥१७॥ तया हीवरी अग्नि होत्रादि याजी करी ब्रह्मचर्य स्वयें तो क्रिया जी अखंडाऽग्नि तेरा सहस्त्राऽब्द होमी करी ख्याति कीं कर्म - कर्ता अहो मी ॥१८॥पद - युग मृदु जें कां पल्लवां तुल्य वाटे तदपि तुडवि कांटे दंडकाऽरण्य - वाटे स्मरत चरित त्याला ठेउनी तोचि ठेवा गमन करि मनीं ते लोक हो पाय ठेवा ॥१९॥ आश्चर्य कीं अधिक साम्य जया असेना त्याला सहाय समरीं कपि ऋक्ष सेना बांधी समुद्र वधि रात्रिचरादिकांही हे कीर्ति तारकहि त्यास न थोर कांहीं ॥२०॥गाती ऋषी नृप - ऋषी प्रति या यशांतें पापघ्न शुभ्र करि दिग्गज जो दिशांतें तो राम मी शरण तच्चरणांऽबुजातें संभाविती सुर - नरेंद्र किरीट ज्यातें ॥२१॥ रघुपति - चरणाचा दर्शन स्पर्श लाहो उठत वसत चित्तीं राघव स्पर्शला हो निघति परम योगी भाग्य तें कौसला हो जितचि भव जयांचा राघवीं नासला हो ॥२२॥पुरुष रघुपतीच्या आयके जो कथा रे भव - भय न तयाचें हें घडी एक थारे तुटति सकळ कर्मे होय दुःखाऽग्नि हिंसा परम - करुण - भूतीं होय टाकूनि हिंसा ॥२३॥ नृप पुसत शुकातें वर्त्तला केविं राम स्व - जन - अनुज - लोकीं सर्व लोकाऽभिराम वद सकळ जनींही केविं तो पूर्ण - काम प्रियतर वरिला जी हा करी पूर्ण काम ॥२४॥ सिंहासनीं बसलियावरि दिग्जयातें धाडी स्वबंधु - वश सर्वहि ते जयातें भृत्यां - सह प्रभु फिरे नगरीस पाहे श्री - मूर्ति दाखवि जनांस करी कृपा हे ॥२५॥ गज - मद सलिलाचे कीं सडे चंदनाचे सुरवर - मुकुटाचे वोवसे वंदनाचे नगर विविध दावी भाव हे मानसाचे रघुपति - पद - पद्मीं लाधले मान साचे ॥२६॥ गोपुरें उपरमाडिया सभा हेम - कुंभ वरि देति यास भा मंदिरीं सुर - गृहीं ध्वजाचि या साउल्या निबिड नित्य ज्यांचिया ॥२७॥ प्रतिद्वार रंभादि - पूगी फलांचे तरु घोंस केले फुलां - पोफळांचे प्रभा तोरणामाजि कां आरशांची महा दीप्ति हेमांऽबरा फारशांची ॥२८॥ स्थळीं स्थळीं आणुनि पूजनातें तों पूजिती लोक निरंजनातें ते बोलती पाळि अजिक्षितीतें पूर्वी तुवां उद्धरिलेंचि तीतें ॥२९॥ देखोनि काळें बहु राघवास त्या त्या पाहती टाकुनियां गृहा सत्या ज्या सुंदरी वेंधति मंदिरोपरी पुष्पें बहू वर्षति हो परोपरीं ॥३०॥ ये त्यावरी निजगृहा - प्रति जे विराजे कीं देखिले सकळ पूर्वज राज राजें वस्तू अमोल्य गणना न धना कदापी जें कां कुबेर - वरुणेंद्र - गृहांस दापी ॥३१॥ स्वयंभा वैडूर्या करुनि रचिले स्तंभ वरवे तयांच्याही पंक्ती क्षितिवरि वरी पाच मिरवे प्रवाळांची द्वारें स्फटिक मय - भिंती विरचिता गृहाच्या रामाच्या सकळ रचना दिव्य उचिता ॥३२॥ शृंगारिलें चित्र - विचित्र - हारीं मुक्तादिकीं रात्रि तमोऽपहारी सर्वोपभोगाऽर्थ समृद्धिकारी वसे गृहीं त्या प्रभु निर्विकारी ॥३३॥ सुगंधीं सदा धूप - दीपीं विराजे जन स्वामि त्यांच्या गृहीं जेविं राजे स्त्रिया जेविं देवाऽगना दास दासी अशा मंदिरी चित्त रामीं उदासी ॥३४॥ प्रभु करि सहसीता त्या गृहीं लोकलीला श्रवण - पठण - मात्रें नाशती ज्या कलीला स्व - सुख - रत विरक्तां सेव्य जो राम होतो स्मर तदुरति काळीं श्रीघनश्याम हो तो ॥३५॥ स्वधर्माऽनुकूळ प्रभू भोग सारे यथा काळ भोगूं न वर्णी असारे बहू वर्ष - वृंदें जरी राहिला हो दिल्हा वामनाला पद - ध्यान - लाहो ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : July 04, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP