मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|ब्रम्हस्तुति|चरण ३| चरण ३ - भाग १ चरण ३ चरण ३ - भाग १ चरण ३ - भाग २ चरण ३ - भाग ३ चरण ३ - भाग ४ चरण ३ - भाग ५ ब्रम्हस्तुति - चरण ३ - भाग १ कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : brahmastutivaman panditब्रम्हस्तुतिवामन पंडित भाग १ Translation - भाषांतर प्रथम चरण येथें वर्णिला भक्ति योगें तटुपरि दुसरा जो ज्ञान - कांड - प्रसंगें पुनरपि चरणीं या भक्ति गोविंदजीची कथिन सरि नपाचे मुक्ति कैवल्य जीची ॥१॥ नित्यानित्य - विचार सार करितां वैराग्य चित्तीं धरी तो जिज्ञासु मुमुक्षु विष्णुचरणीं सप्रेम सेवा करी ज्ञानें अद्वय भक्ति त्यास कळतां ती गोड मुक्तीहुनी जीवन्मुक्त मुकुंद - भक्ति करितो सर्वात्मभावें मनीं ॥२॥ स्कंध जो प्रथम भागवती या श्लोक तेथिल असाच पहाया मुक्तही करिति माधवजीची भक्ति मुक्ति नकरी सरिजीची ॥३॥ जो सर्वत्र जगत्प्रकाशक जगीं तंतूच जैसा पटीं कीं कालत्रयिं आत बाहिर दिसे मातीच नानाघटीं आत्मा येरिति पाहती रमति जे त्यामाजि ऐसी स्थिती आत्माराम म्हणूनि संस्कृतपदें ऐशांसि वाखाणिती ॥४॥ आत्माराम असे शुकादिक मुनीं ज्यांचे अविद्यामय ग्रंथी सर्वहि सूटले जितचि जे ब्रम्ह स्वयें अद्वय भति श्रीपतिची उगीच करिती तेही निमित्ताविण कीं मुक्तीहुनि गोड केवळ असे श्रीमाधवाचे गुण ॥५॥ येरिती सगुण सुंदर भक्ती मुक्त ही करिति साधुनि मुक्ती आदि अंतिं हरिभक्तिच संतां हेंचि वर्णित असे विधि आता ॥६॥ ज्ञान - हेतु हरि भक्तिच आधीं ज्ञानियांसि तरि तेचि समाधी ज्ञानसिद्ध सकळात्मक भक्ती प्रीति आत्मगत अन्य - विरक्ती ॥७॥ असा भाव दाऊनि आद्यंत - भागीं वदे भक्तियोगा विधी आदियोगी मधें ज्ञानकाडें स्तुती श्रीहरीची करुनी पुन्हा भक्ति वर्णी विरिंची ॥८॥ असंतीं कसा धुंडिला आणि संतीं चिदात्मा असा ज्ञानकांडीं तदंतीं विधी बोलिला येस्थळीं केवळात्मा कळे वर्णिला तो अनायास - वर्त्मा ॥९॥जड शरीर - विलक्षण आत्मता सुगम ती गमती परि तत्त्वता हरि तुझ्याच कृपे करितां फळे हुडकितां न कदापिहि आकळे ॥१०॥ तरिच बोध रमापति - भक्तिनें म्हणति केवळ वेद न युक्तिनें म्हणुनि तूं करुणा करिसी जयीं म्हणतसे विधि तत्त्व कळे तयीं ॥११॥ सुगम गमत आहे बोध देवा तथापी अनुभव धरणें जो पूर्व - बिंब - स्वरुपीं चरण - कमळ तूझें तत्प्रसादांश - लेशें नघटित तदभावें धुंडितां सावकाशें ॥१२॥श्लोकार्थ - संक्षेप असाच येथें भावार्थ आतां वदिजेल तेथें आत्मज्ञता मानिति एक सोपी तत्वंपदार्थी प्रतिबिंबरुपी ॥१३॥ देहास जाणे प्रतिबिंब त्याला जाणूनियां मानिति बोध झाला शवासही भासवि तो कळेना जोकां प्रसादाविण आकळेना ॥१४॥ क्षेत्रा आत्मपणेंच जाणत असे क्षेत्रज्ञ जीवाख्य तो ज्याला तत्वमसी म्हणूनि निगम त्वंशब्द हा योजितो तो तों चित्प्रतिबिंब जो अनुभवीं पाहे स्वबिंबात्मता बिंब श्रीभगवत्स्वरुप - महिमा श्लोकांत या तत्वता ॥१५॥ त्वंपदार्थ घडतो प्रतिबिंबीं तत्पदार्थ सकळात्मक - बिंबीं तत्त्वबोध भगवन्महिमेचा त्वंपदा वदति या श्रुति - वाचा ॥१६॥ जो देशांतर - दृष्ट तोचि नर हा देशांत ही देखिला तें देश - द्वय टाकितां स्थळयुगी तो एकला देखिला जे येणेरिति लक्षणा करिति ते कूटस्थ - सर्वेश्वरा कूटस्थीं प्रतिबिंब आठउनियां कूटस्थ केला खरा ॥१७॥ जीवोपाधि शरीर कुंभ - न भवत् कूटस्थ - देहीं वसे जें ब्रम्हांड मठांत ईश्वरपणीं चिव्द्योम तें उल्लसे दोघां ऐक्य असे रिती सहज हें तें साधितां जीव हा कूटस्थीं प्रतिबिंब मेळउनियां त्या लक्षणें तो पहा ॥१८॥ कूटस्थीं प्रळयीं सुषुप्ति समयीं एकत्व तों नाकळे ज्ञानें ऐक्य समाधिमाजि घडतें बुद्धीस तेव्हां कळे कूटस्थीं प्रतिबिंब मेळउनियां यालागिं वेदश्रुती जें कां सिद्धचि ऐक्य तें असिपदें येणेरिती बोलती ॥१९॥ जीवोपाधिमधें अखंडचि जरी कूटस्थ हा निश्वयें भोगातें प्रतिबिंब भोगित असे तो तों अभोक्ता स्वयें त्याला बंध न मोक्ष ऐक्य सहजें तें साधिलें हें जरी ज्याला बंध तयास तें अनुभवा एकत्व येना तरी ॥२०॥ आतां श्रीगुरु जी अनात्मजडता मिथ्या निषेधूनियां आत्मा - सर्व - निषेध - शेष उरवी आत्मत्व बोधोनियां तो तों आपण या प्रतीतिस दिसे भोक्तृत्व पूर्वी जया प्रारब्धात्मक भोग येतिल पुढें तें भोगणेंही तया ॥२१॥ एवं येरिति आत्मता सुगम हे शिष्या गमे तत्त्वता ते याची प्रतिबिंबता न कळली याला स्वबिंबैक्यता कूटस्थैक्य म्हणूनियां असिपदें एकत्व जें बोधिलें श्रीगोविंद - दया - प्रसाद - निपुणें तें पाहिजे साधिलें ॥२२॥ बिंबात्मतेंत उपजे जड देह त्याला आत्मा धरी त्यजिहि तो प्रतिबिंब बोला तो अन्य देह जड अन्य - जडास जेव्हां टाकूनि जाय जड भासक तो न तेव्हां ॥२३॥ टाकूनियां सर्प असत्य दोरी त्याचें अधिष्ठान नजाय दूरी भासे कसा सर्प न रज्जु जेथें शवांत तों न प्रतिबिंब येथें ॥२४॥ ममैवांशो जीवलोके म्हणूनी गीता वाक्यें अर्जुनालागिं कानीं जो कां भोक्ता आपुला अंश सांगे तो चौर्यासीं लक्षयोनींत वागें ॥२५॥ उत्क्रामंतं स्थितंवा म्हणउनि वदला कृष्ण गीतेंत जेव्हां जाणें येणें न बिंबा त्यजुनि जड तनू जातसे अंश तेव्हां जातो टाकूनि देहा परि जड दिसतें त्या मृषा सर्प रुपीं आहे जो बिंब रज्जू हुडकुनि मिळती संत त्या चित्स्वरुपें ॥२६॥ जें पूर्वपद्यें वदला विधाता कीं रज्जु तूं संत तुतें अनंता धुंडूनियां पावति चित्स्वरुपा तें बोलवेना प्रतिबिंब - रुपा ॥२७॥ टाकूनि जो जाइल अन्यदेहा तो पूर्वदेहीं नअसेंचि पाहा तो देह सर्पात न रज्जु तेव्हां जो गेलिया देह दिसेच जेव्हा ॥२८॥ चैतन्य तुल्य दिसतें प्रतिबिंब बिंबीं एकत्व दोहिंस समाधि - सुखावलंबीं देहांत मात्र अधिक प्रतिबिंब पाहीं सर्वात्मता अनुभवांत दिसे न कांहीं ॥२९॥ सत्वांत त्यांत निज चित्प्रतिबिंब होतें तें सत्व विश्वमय बिंब जयीं पहातें बिंबैक्य पावत असे प्रतिबिंब तेव्हां बिंबावरी पसरतें निज सत्व जेव्हां ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : July 03, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP