दूतांला वदला कृतांत हरिचीं नामें जयांच्या मुखीं
त्यांला दंडन मी न थोर अथवा कोण्हीं करी आणखी
आतां धर्म तयांसि सांगत असे कीं जे तयां वेगळे
ते आणा नरकाप्रतीतुम्हि अरे बांधोनि त्यांचे गळे ॥१॥
आजन्म जो विमुख विष्णुपदारविंदीं
सेवीन कीर्तिमकरंद कधीं न वंदी
ऐसे जगीं बहुत ते नरकार्ह जाणा
दूतां म्हणे यम तथां नरकास आणा ॥२॥
जे कांविरक्त हरिभक्त तदंघ्रिधूळी
ज्याच्या घरीं न पडल्या असती त्रिकाळीं
ऐशा गृहीं नरकमार्गमयीच तृष्णा
दूतां म्हणे यम तयांनरकासि आणा ॥३॥
श्रवण कीर्तन माधववंदनें जळति पूर्विल पापहिकाननें
विधिकरांप्रति यास्तव ये रिती वदतसे यम संयमनीपती ॥४॥
श्रोते येथें वदति जळती सर्वही पूर्व - पापें
जाणो नेणो परि अघ - हरें विष्णुनामेंप्रतापें
पूर्वी शुद्धी द्विविध कथिल्या त्यांत अत्यंतशुद्धी
नाहीं जोंतों न घडति कशा मागुनी पापवृष्टी ॥५॥
बंदी सेवी हरिहरि म्हणे जी तो एकदाही
त्याला कैसा यम म्हणतसे यातना दुःख नाहीं
पापीं धांवे जरि मन पुन्हा यातने योग्य झाला
ऐसे जे कां वदति वदतो ग्रंथकर्ता तयाला ॥६॥
धाडील दूतां यमधर्म जेव्हां आणावया जातिल दूत तेव्हां
या मृत्युकाळी जरि नाम वाचे ये यातना - लोक तयांस कैंचे ॥७॥
आणू नका म्हणतसे यम याचि भावें
जें आणणें मरणकाळचि तो स्वभावें
जेव्हा घडे स्मरण वंदनमात्र काहीं
तो यातनाई सहसा जन होत नाहीं ॥८॥
ज्या चेधरीं न हरिभक्त - पदाञ्जधूळी
तृष्णा जयास सदनांत असे त्रिकाळीं
आणा तयास म्हणतो यम कीजयाला
संतप्रसाद हरिभक्ति घडे न त्याला ॥९॥
येथें न यास्तबवहि आणिक शास्त्रनीती
मिध्याफल या सकळनिष्कपटार्थ जेथें
मिथा - फळ कृति कशा बदतील एथं ॥१०॥
ऐसें अजामिळमुखीं हरिनाम अंतीं
येतां त्वरें करुनि सोडविलाच संतीं
प्राणप्रयाणसमयीं हरिदास्य कांहीं
होतांचि शुद्धि मग दंड तयासि नाहीं ॥११॥
याहीवरी यम म्हणे निजकिंकरांला
कीं नेणतां झणि पहाल अशां नरांला
ते तों बळेंच सुटतील परंतु तेथें
भी सापराध तुमचा अपराध जेथें ॥१२॥
धरुनी असा भाव पाटीं अनतां स्मरोनी मनीं प्रार्थितो धर्म आतां
मुखीं नाम जो घेतयाला स्वदूतीं कसें बांधलें हात्चि संताप चित्ती
दृदयिं आठउनी पुरुषोत्तमा यम म्हणे अपराध करीं क्षमा
द्विजमुखी तव नाम तथायवी उचलिले कर यां यमकिंकरी ॥१४॥
महदेतिक्रम हा रचिला हरी न कळतां तव किंकरकिंकरीं
विनवितो कर जोडुनि ईश्वरा करिं दया करुणाऽमृतः सागरा ॥१५॥
अत्यंत शुद्धि हरिकीर्तनभक्तिभावें
हें तों खरें परि न जाणतही स्वभावें
नारायण - स्मरण - कीर्तनमात्र काहीं
ज्याला घडेल मग पातक त्यास नाही ॥१६॥
प्राण - प्रयाग - समयीं यमदूत जेव्हां
येती घडे किमपिही हरिदास्य तेव्हां
आजन्म पातक जळे मग त्या पवित्रा
होतील दुर्गति कशा विविधा विचित्रा ॥१७॥
याकारणें प्रकरणार्थ समस्त आतां
श्रीव्यासपुत्र वदतो सुखकार संतो
ज्या वर्णिल्या विविध शुद्धिहि विष्णुदूतीं
नामप्रताप शुक वर्णिले तोचि अंतीं ॥१८॥
बोले श्रीशुक कीं नृपा धरि मनीं या पूर्विल्या कौतुका
तस्मान् कारण विष्णुकीर्तन असें निर्दाळितें पातका
पापें जींबहु थोर थोर नरक प्राप्तीच ज्यांची फळें
प्रायश्वित्त तयांसही परम हें नामें जगन्मंगळें ॥१९॥
पापास तों भलतशा हरिनाम जाळी
त्याचेंच कीर्तन घडे जरिसर्वकाळीं
पापी प्रवृत्तिच नव्हे अतिशुद्ध - चित्ता
श्लोकद्वयेंकरुनि वर्णिलहेंचि आतां ॥२०॥
नामोच्चारणमात्र ज्यांस घडलें ते पावले सद्गती
सामर्थ्ये हरिचीं अशीं घडिघडी जे वर्णिती ऐकती
त्याला जे उपजेल भक्ति हरिची अत्यंत ते शुद्धता
तैसीं तीर्थ तपोव्रतें न करिती हें जाण तूं सुव्रता ॥२१॥
अजित - भक्ति मनी उपजे जया मग अपेक्षित काय नृपा तया
अजितकीर्तनशुद्धि असी बरी म्हणुनियां शुक वर्णिल यावरी ॥२२॥
कृष्णाची पदपद्मचित्सुखसुधा सप्रेम जे चारवर्ती
ते मिथ्या मृग - नीर - मायिक - गुणीं कां हो पुन्हां माखनी
प्रायश्वित्त तदन्यही अद्य हरी शुद्धी तरी त्या तशा
कीं हस्ती धुतला तथापिहि धुळी तीरीं शिरीं घे तशा ॥२३॥
शुक मुखें इतिहास नृपें असा
हदयिं आइकतां बसला ठसा
परम विज्वर या मुनिउत्तरें
नृपति होउनि मानियलें खरें ॥२४॥
नरकनाशक नाम नरेश्वरें
शुक मुखें हरिचें अति आदरें
परिसतां अति विस्मित मानसीं
मन बुडे हरिनाभसुधारसीं ॥२५॥
बहु सुखी बहु विस्मित भूपती
नयनि देखुनियां शुकल्याप्रती
वदतसे तुज विस्मय यापरी
नवल मानियलें यमकिंकरीं ॥२६॥
बोले श्रीशुक कीं नृपा स्वपतिची ऐकोनि हे वैखरी
दूतीं विस्मित होउनी धरियली आज्ञाशिरीं हे खरी
आतां ते तइ पासुनी हरिजना दृष्टी पहातां भिती
जेथें श्रीहरिकीर्तनें चुकउनी तो ठाव ते भोंवती ॥२७॥
अगास्तिने हेचि कथा शुकाला
सांगितली जे शुक बोलियेला
तथापि हें व्यासमुखें पुराणीं
भविष्य बोले मुनिवर्यवाणी ॥२८॥
स्वपुत्र सांगेल पुढें स्वशिष्या
नृपा असें वर्णियलें भविष्या
तें बोलतां श्रीशुकही नृपाला
कीं हे अगस्ती मज बोलियेला ॥२९॥
शुक म्हणे फिरतं क्षिति - मंडळीं
सदितिहास असा मलयाचळीं
मज वदे असतां हरिपूजनीं
अति दयाळु अगस्ति महामुनी ॥३०॥
तृतीय अध्याय विचित्र येथें
संपूर्ण झाला इतिहास जेथें
समर्पिला श्रीहरि - पादपद्मीं
पद्मोलयेच्या अति दिव्य सद्मीं ॥३१॥
ऐसा नाम सुधा म्हणोनि रचिला श्रीवल्लभें ग्रंथ हा
सर्वात्मा हरि वामनाऽननमिसेंजें बोलिया तें पहा
जे हा वर्णिति आयकोनी धरिती भावार्थ त्या सज्जना
होती भागवती गतीकलियुगी नामें जसी वामना ॥३२॥
समाप्त.