संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ ।
मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥२७॥
सावधानेंअविकळ । न चुकतां पळें पळ ।
संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥१८॥
त्रसरेणूपासोनि जाण । लवनिमिषदिनमान ।
संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥१९॥
मधुमाधव वसंतयुक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू ।
मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥२२०॥
गणितां न ये पंचांगांत । नक्षत्रीं असोनि सदा गुप्त ।
अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥२१॥