मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सहावा|
श्लोक १५ वा

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अस्यासि हेतुरुदयस्थितिसंयमानाम् । अव्यक्तजीवमहतामपि कालमाहुः ।

सोऽयं त्रिणाभिरखिलापचये प्रवृत्तः । कालो गभीररय उत्तमपूरुषस्त्वम् ॥१५॥

जगाची उत्पत्ति स्थिति । तुजचिपासोनि श्रीपति ।

सकळ संहरिता अंतीं । तूंचि निश्चितीं महाकाळु ॥७८॥

क्षोभलिया तामसी शक्ती । सृष्टीचा प्रळय करी अंतीं ।

तेथें बीजरूपीं अव्यक्तीं । जीव राहती सूक्ष्मत्वें ॥७९॥

मग उत्पत्तीचे काळवेळे । तींच बीजें विरूढती सकळें ।

पाल्हेजती स्थितिकाळें । पुष्पफळें सफळित ॥१८०॥

' हे गुणक्षोभाची अवस्था । तेथ मी नव्हें प्रळयकर्ता ' ।

ऐसें म्हणसी जरी कृष्णनाथा । तरी हे कथा परियेसीं ॥८१॥

तुझा साचार जाहलिया भावो । माया महत्तत्व आणि जीवो ।

नासोनियां दास पाहा हो । निजपदीं निर्वाहो भोगिती ॥८२॥

त्या तुज सकळ संहारितां । कोण दुर्घटता कृष्णनाथा ।

कारणेंसी प्रळयकर्ता । तूंचि सर्वथा महाकाळु ॥८३॥

कळों नेदिसी संसारस्थिती । अतिसूक्ष्म काळगती ।

नाश करिसी अंतीं । निजप्रकृतिविकार ॥८४॥

प्रळयासी प्रमाण मूळ । लव निमेष घटिका पळ ।

अहोरात्र त्रिकाळ । 'त्रिनाभी' केवळ जो म्हणिये ॥८५॥

ऐसिये गंभीर गतीसीं । मायामहत्तत्व नाशिसी ।

तो तूं 'महाकाळ' होसी । हृषीकेशी श्रीकृष्णा ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP