श्रीदत्तलीलामृताब्धिसार - फलश्रुति

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.


फलश्रुति

अनधिकारां स्त्रीशूद्रां । ॐकारी भाविकां भद्रा । दुष्‍ट मानी की भक्‍त्यार्द्रां । हा धर्मांशु ॥१॥

ठसवि जो बोध खेद । न राखी नुरवी भेद । काळावरी मारी पाद । ली ले नेंची ॥२॥

राग द्वेषां देयी लत्ता । मोहादिकांची जो सत्ता । लपवी त्या गुरुदत्ता । ला जेती मा ॥३॥

शेंकडोही विघ्न कुत्रे । नाशा जाती हो ती भित्रे । दत्तात्रेय स्मृतिमात्रें । मृत्युग्रासी ॥४॥

एक भक्‍ती असे जया । राहे निर्धारहा तया । वसे गंगा गोदा गया । तयापाशी ॥५॥

कुलशीला की जे काय । यमादिकाविना स्वीय । तारी कर्तृत्व ते हेय । सिंचिद्रूत ॥६॥

णीजंतता ही ज्या येन । णावमकार म्हणून । परभक्‍त्या ध्यातां मन । धुवी पाप ॥७॥

समबुद्धये ते नमः । यतीश्‍वराय ते नमः । शांति प्रयच्छ ते नमः । नित्यसाक्षिन्‌ ॥८॥

शर्वो जोपि कुर्यात्कामं । मंद्स्याभक्‍तस्य वामं । तत्रापि ते कृता कामं । बंधुताऽऽहो ॥९॥

किंचिन्नांतरं कुर्वेत्र । त्रयीमूर्ते त्वं साक्ष्यत्र । ये तत्कुर्युंर्भयं तत्र । धत्सेऽद्वय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP