मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
परिटा येशिल कधि परतून ? ॥...

प्र.के.अत्रे - परिटा येशिल कधि परतून ? ॥...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


परिटा येशिल कधि परतून? ॥धृ०॥

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!

सदर्‍यांची या इस्तरिने तव चाळण पार करून!

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टिमधे परतून!

तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणी करून!

गावातिल कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून!

रुमाल जरिचे आणि उपरणी महिनाभर नेसून!

सणासुदीला मात्र वाढणे घेइ तुझे चोपून!

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP