झिम्म्याची गाणी - संग्रह ३

श्रावणात माहेरी आल्यावर माहेरवाशीण झिम्मा घालताना ही गाणी म्हणतात.


१६.

पुसे लेक मना, वास माडी व कसाना ?

मना माहेरना, वारा ज वाही ऊना

पुसे लेक मना, पूर नदीले कोठना ?

मना माहेरना, नाला ज वाहा ऊना

पुसे लेक मनी, चांदनीले काम्हुन् तेज

माहेर नी देवी- मायनी तिले देख !

पुसे मनी लेक सूर्या काम्हुन तापना ?

माहेरना देव- बापले राग ऊना !

पुसे मना राम- आज का व तू खुषीत

माहेरनी ईद, मना हिरदाले भूषीत

पुसे मना राम, हात जोडस कुनाले ?

मन माहेर पालखी, पालखीना देवसले !

१७.

मना माहेरना, भाऊ शे मुसलमान

बहीनना साठे, कशी तरमये जान

मना माहेरना, भाऊ लागस हाऊ वान्या

नादार बहीनले, ऊधार देस दाना

मना माहेरना, भाऊ सोभस सोनार

भासीना करिता, मासोया देनार

मना माहेरना, भाऊ हाऊ शे चम्हार

भासाना पायले, जोडा नरम देनार

१८.

भाऊ आज येई, हाडया कोकाई र्‍हायना

गना बायसाठे, सोनाना पायना

बंधू आज येई, डोया फडकस मोठा

भासासाठे लई, चांदीना भरदोटा

भाऊ आज येई, भरे तोटर जेवता

लाल रेसमनी, कुडची भासा लेता

१९.

एक डोया हुगडू, मी ते एक डोया लावू

इबाक मना राम, तिबाक मना भाऊ

एक कान खोलू, मी ते एक कान झाकू

इबाक सासरा, तिबाकना पिता देखू

दोन्ही हात जोडू मी ते दोन्ही हात जोडू

बहीनना कथ मना रामना हाऊ साडू

एक जीव राहे मना, एक जीव जाये

सासर-माहेरमा, हाऊ कल्हो कसा बये !

२०.

गई मायबाई, तिना पोट न्हाना न्हाना

वडील बहीन, मना मानसू पोटना

गई मायबाई, गई मंदीरनी रया

माय ना मचूक, मी ते लावूस व मया

गई मायबाई, मना पिता किलवाना

पिता रडे धाई धाई, उरे लाई लाई तान्हा !

गई मायबाई मायममूक माहेर काई ?

पिता रडे धाई धाई, मना जीवले हाई हाई !

२१.

आतेना कलीमा, देव झाया व निठूर

मना माहेरले, सोनाना व्हता धूर

आतेना कलीमा, देव व्हई ग्या चगेल

मना माहेरले, देखी काटी हो लागेल

आतेना कलीमान, देवले नही दया

मना माहेरले, उनी मसाननी कया

२२.

बिना-माहेरची, नको करु कोना देवा

पहले आंडेर मारवा, मग मायबा मार वा

बिना-माहेरची, नको करु शिरीहरी

बंधवा मचूक, काय सोभा ती माहेरी ?

बिना-माहेरची, नको करु रे इठ्‍ठल

माहेर नही तिले, काय सासर व्हईल ?

बिना-माहेरची, करशी ते कर देवा

सासू नि सासरा, मायबासारखा होवा

२३.

लगीन झायावर, तुले कसाले माहेर ?

ज्या घर दिनी पोर, त्या घरले मानो बर

लगीन झाल्यावर, नार झाई पराईनी

देस झाया परदेस, माय बिगर-मयानी!

लगीन झायावर, माहेरनी नको ओढ

सासरनी सुरी गोड, माहेरनी सरी तोड !

२४.

दूरथून देखू, मन माहेर सोनान

जोडे जावा, घर, पडी र्‍हायन लोनान

दूरथून देखू, मना बाप शे 'माया'- मा

जोडे जावा, कोनी नही र्‍हायना कह्यामा

दूर थून देखू, भाऊ-बहीण जोडीना

जोडे जावा, रडूज ये, झगडा तोडीना

दूरथून देखू, माले भूषण माहेर

भासा कसा म्हने, फुई आने ना आहेर

दूरथी देखवा, माहेरले खुशी होवा

जोडे जावा, वास लेवा, 'आरनी' ना वास येवा

माहेरले जाऊ, माले माहेर कसान !

पिताना मचूक गाव होयेल मसान !

माहेरले जावा, कोन्या बंधूले भेटना !

ऐकमागे दोन, डोंगर मोठाला खसना !

माहेरले जाऊ, नही माय मयावाली

'लेक-लेक' करी, तिने आरोई फोडली !

माहेरल जाव, मन माहेर मावन

चुलताना घर, नही मन मन निवायन

माहेरले जाऊ ! माहेरना झाया घात !

सुख गरीबान, नही देवले देखात !!

माहेरले जाऊ मन लानेना ज चीत !

आते ना कली मा, देव व्हई गया दैत !!

माहेरले जावा मी ते झुरस मनात

मना हिरदाना, परभु तुकडा कयात !

माहेरले जाऊ काय देवन नाव लिऊ ?

नगरी व सुनी ! नही बाप, नही भाऊ !!

माहेर लागना, हाऊ पहाड कसाना ?

माले बलावस, पिता मना हाऊ बानीना !

माहेर-लागनी, हाई नदी व अंजनी

मनी तीस भागाडे, हाई माय शे रंजनी !

माहेर-लागती----देखू राई शे आमनी

अमरुत चाखू, वानी भाऊ मीठारामनी !

माहेर लागता----हाऊ मारोतीचा पार

पारवरी बठी---मन जीव थंडगार !

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP