९.
झिरीमिरी झिरीमिरी पावस पडे
भावाची भैन खेळत दोघा
मारिली भावान लाथ
धरिली सासर्याची वाट
मिळाली आपले मामंजीक्
'लाडके सुनेचा येना कसा जाला ?'
"ऐका, ऐका मामंजीनु सांगतय् तुमका"
भावाची भैन खेळत दोघा.....
मिळाली सासूबाईक
'लाडके सुनेचा येना कसा जाला ?'
"आयका आयका सासुबायनु सांगतय् तुम्का"
भावाची भैन खेळत दोघा.....
मिळाली न्हानगे भावोजिक्
'लाडके वैनीचा येना कसा जाला ?'
"आयका, आयका भावोजिनु सांगतय् तुम्का"
भावाची भैन खेळत दोघा.....
मिळाली ननान्बाईक्
'लाडके वैनीचा येना कसा जाला ?'
"ऐका ऐका ननान्बायनु सांगतय् तुमका"
भावाची भैन खेळत दोघा.....
मिळाली आपुल्या पतीक्
'लाडके पत्नीचा येना कसा जाला ?'
"आय्का आय्का सांगतय् तुम्का"
भावाची भैन खेळत दोघा
मारिली भावान लाथ
धरिली सासर्याची वाट
१०.
मामोजी कसे हो मामोजी कसे
हातीत् रुमडी शेतकार कसे ।
सासूबाय कशी हो सासूबाय कशी
हातीत् डवली धरनी जशी।
भावोजी कसे हो भावोजी कसे
हातीत् रुमाल देवळी कसे ।
जावबाय कशी हो जावबाय कशी
पायार् मिरी भाइन् कशी
ननान् कशी हो ननान् कशी
चिखलात् लोळता म्हशी कशी
ते बाई कसे ? हो ते बाई कसे ?
हातीत् लिख्नी कारकून कसे
मिया बाये कसा ?
कपाळाक् चिरी लक्ष्मी जसा
११.
सरला शिरवान् लागला भादो भाव आला भैनीला न्याया हो
पार्वती बोले देवा देवा ईश्वरा दे माका माहेरा रजा हो
गळ्यातली माळा घाल्तय् पार्वती नको जाव तुया माहेरा हो
गळ्यातली माळा घालीत माका बंधु मिया जातय् ईश्वरानु माहेरा हो
सरला शिरवान्....
कानातली बुगडी घालतय् पार्वती नको जाव तुया माहेरा हो
कानातली बुगडी घालीत् माका बंधु मिया जातय् ईश्वरानु माहेरा हो
सरला शिरवान....
१२.
सासू गेली पान्याला सुनेन भाजिल्या तुरी
सुनेन् भाजिल्या तुरी ।
खावक् गेल्या वसरेक् सासयेन लायिली चोरी
हरि हरि भग्वाना माझा माहेर दूरी
धवळ्या नंदीर् लेक बैसुनि आली
बाप्पा म्हनता लेक भुकेची आली
नाय बाप्पा भुकेची आमचा बारदेशी खाना ।
बुगडेचा लेना ।
आए म्हनता लेक भुकेची आली
नाय आए भुकेची आमचा बारदेशी खाना ।
पुतळ्याचा लेना ।
बंधु म्हनता भैन भुकेची आली
नाय बंधु भुकेची आमचा बारदेशी खाना ।
कापूर---शेला ।
१३.
चौथीच्या सनाला बाप्पा आला न्यायाला
धाडतास् का माहेरा ?
मज काय फुसशि गे फुसा आपुल्या सासुबायशी
बाजयेतल्या सासुबायनु आए आली न्यायाला
धाडतास का माहेरा ?
मज काही फुसशि गे फुसा आपुल्या दिराशी
साळेत जातल्या भावजीनु तुम्ही होशार
धाडतास् का माहेरा बंधु आला न्यायाला
मज काही फुसशि गे फुसा आपुल्या जायेपाशी
पान खातल्या जावबायनु भैन आली न्यायाला
धाडतास् का माहेरा ?
मज काही फुसशि गे फुसा आपुल्या पतीपाशी
धोरा राखतल्या भर्तारानु बंधु आला न्यायाला
धाडतास् का माहेरा ?
जा फुली ये फुली गे दीड दिवसाची रजा
१४.
सम्रता भैणीचो दुर्बळ भाव
गेलो गे भैणीच्या घरा
भैणीच्या सासयेन् दुर्सुन् देखिलो
'अगे गे लाडये सुने
तुजो तरी बंधुराया येतो'
"माजो तरी बंधुराया कसलो असा ?"
'नेस्लो लंगोटी, माथ्याक् आसा चिंधोटी'
"हाडा गे पाठल्या दारा" ॥
पंगार्याचो सळपो गे करटीत् सून् पानी
सुबंध बंधुचो सत्कार केलो
लाइली माळ्याक शिडी
काढिले वरयो तांदुळ
वरयो आधना वोतिले
वरयाचो भात गे आंबाडयाची भाजी
राखीचे खोपीत् पुरुन् ठेय्लो ॥१॥
गेलो गे मित्राच्या घरा
मित्राच्या आवशीन् दुरसून देखिलो
चंदनाचो पाट गे झारयेतसून् पानी
सुबंध मित्राचा सत्कार केलो ॥
लाय्ली माळ्याक शिडी
काढले साळी डाळी आधना वोतीले
सुबंध मित्राक भोजन् सारिला ॥२॥
गेलो गे अष्टी बाजारा
घेतला अष्टी धोतर
घेतलो हिरवो मंजिल
घेतलो नि गे चाबूक
बसलो धवळ्या वारवार ॥३॥
गेलो गे भैनीच्या घरा
भैनीच्या सासयेन् दुरसून् देखिलो
'अगे गे लाडये सुने
तुजो तरी बंधुराया येतो'
"माजो तरी बंधुराया कसलो आसा ?"
नेसलो अष्टी धोतर माथ्याक् हिरवो मंजिल
धवळ्या वारवार बसकार केलो
हाडा गे फुडल्या दारा
चंदन-पाट गे झारी भरुन् पानी
'माका गे खैची भैनी पानी ?
माका गे खैची भैनी म्हनी ?
पंगार्याचो सळपो गे करटींत्सून पानी
राखयेच्या खोपीत बसकार केलय्' ॥४॥
काढिले साळी काय डाळी
सुबंध बंधूक् भोजन् सारिला
माका गे खैचा भैनी भोजन
वरयाचो भात गे आंबाडयाची भाजी
राखयच्या खोपीत् पुरुन ठेयलो
इलो गे आपुल्या घरा ॥५॥
१५.
गावना गावमा, मन साहेर-माहेर
दोन्ही हेरसले, पानी पुराये एक हेर
गावना गावमा, कारभारी याही याही
आईमा अवाई, सासराथी जवाई सवाई
गावना गावमा, नांदती यीन्ही यीन्ही
गंगायमुनाना संगम देखवा कोन्ही ?