प्रीतीविण

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


प्रीतीविण प्रासाद गमे शून्य जिवाला

येईल चितेचीच कळा इंद्रमहाला !

प्रीतीविण पुष्पांतिल लोपेल सुगंध

प्रीतीविण ज्योत्सनेत पहा दाहक ज्वाला !

प्रीतीस नको तख्त नको ताजमहाल

प्रीतीस हवी प्रीति, वृथा खन्त कशाला ?

प्रीतीत फुले जीवन, प्रीतीत सुखाशा,

प्रीतीविण दावानल, ग्रासेल भवाला !

प्रीतीसह मागावर येईल वसन्त

प्रीतीविण अन् जीवन शोषेल उन्हाळा !

वक्षावर विश्रान्त तुझ्या होइल माथा

बाहूत तुझ्या रक्षक लाभेल दुशाला !

हातात सख्या, घालुनिया हात प्रवासा

ये संगति, प्रीतीवर ठेवून हवाला !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - माहीत नाही

सन - माहीत नाही

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP